संपूर्ण जगतला अहिंसेचा मार्ग दाखवणारे चौविसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामींची जयंती रोहा जैन समाजातर्फे ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणुक पालखी काढुन उत्साहात साजरी करण्यात आली.
गुरुवार दि. १० एप्रिल रोजी कांच मंदिर सत्यनारायण रोड येथील जैन समाज मंदीर येथून हया भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. ही भव्य मिरवणुक रथ, ढोल वाद्यांचा गजरात पालखी रोहा अष्टमी नगरपरिषद ते संपूर्ण बाजारपेठेतून मार्गक्रमण करत ओसवाल भवन येथे मिरवणूकीचे समारोप करण्यात आला.
सदर पालखी सोहळामध्ये ” त्रिशला नंदन वीर की… जय बोलो महावीर की, अहिंसा परमो धर्म, जैनम जयती शासनम ” महावीर भगवान की जय , त्रिशला नंदन वीर की,जय बोलो महावीर की,अशा घोषणा जैन समाज बांधवांतर्फे घोषणांनी परिसर दुमदुमून गेले.
यावेळी समाज अध्यक्ष दिलीपशेठ सोलंकी, माजी नगरसेवक राजेंद्र जैन, वसंत कोठारी, कैलास जैन, जितु लूनिया, सचिन जैन, मनोज जैन, भरत जैन, संदीप जैन, सुनील कोठारी, सागर कोठारी, हेमू जैन,भैरु कोठारी, पप्पु सोलंकी यांसह असंख्य जैन बांधव आणि भगिनी उपस्थित होते.
भव्य मिरवणूकी नंतर महाप्रसादचा आयोजन करण्यात आले होते. भगवान महावीर जयंतीनिमित्त मंदिरे सजवण्यात आली होती. अतिशय आनंदी उत्साही वातावरणात भगवान महावीर जयंती साजरी झाली. यानिमीत्ताने जैन मुनी श्री दर्शन सागर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.