भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात त्याला वगळल्यानंतर, कर्णधारपद सोडण्याच्या चर्चांना उधाण आले होते. शनिवारी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत रोहित शर्माने यावर थेट आपली भूमिका स्पष्ट केली.
या बैठकीत रोहित शर्माने काही काळच कर्णधार राहण्याचा निर्णय जाहीर करत, बीसीसीआयला नवीन कर्णधार शोधण्याची विनंती केली. त्याने बोर्डाच्या निवड प्रक्रियेला संपूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. यावेळी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जसप्रीत बुमराहला कर्णधार करण्याबाबत चर्चा झाली, मात्र त्याच्या वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
दरम्यान, रोहित शर्मा 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाचे नेतृत्व करणार हे निश्चित झाले आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याला कर्णधारपद किंवा संघात स्थान मिळणार नाही, असे संकेत मिळत आहेत. आता बीसीसीआय यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.