रोहा वनविभागाचे नवे उपवनसंरक्षक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव तर प्रादेशिक सहाय्यक उपवनसंरक्षक रोहित चौबे

Roha forest officer
माणगांव (रविंद्र कुवेसकर) :
भौगोलिक दृष्ट्या रायगड जिल्ह्यात वनविभाग दोन उपवनसंरक्षक विभागांमध्ये विभागलेला आहे. त्यातील उत्तरेकडील अलिबाग वनविभाग आणि दक्षिणेकडील रोहा वनविभाग अशी प्रादेशिक कार्यक्षेत्रे आहेत. रोहा वनविभागात उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत यांच्या बदलीनंतर दि. १३ फेब्रुवारी २०२५ पासून डॉ. शैलेंद्रकुमार जाधव यांनी रोहा प्रादेशिक विभागाच्या उपवनसंरक्षकपदी पदभार स्वीकारला आहे.
डॉ. शैलेंद्रकुमार जाधव हे मूळचे गाव शेरे, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील असून त्यांचे प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण सातारा व कराड येथे झाले असून पुढील शिक्षण कृषी पदवी व डॉक्टरेट कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथून प्राप्त आहे. २००८ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत जाधव यांची वनविभागात नियुक्ती सहाय्यक वनसंरक्षक म्हणून झाली. २००९ -११ साली केंद्रीय वन अकादमी डेहराडून येथे प्रशिक्षण झाले. २०१४ तें १६ महाराष्ट्र शासन वनविभागाच्या कुंडल येथील फॉरेस्ट अकॅडमी मध्ये प्रशिक्षण निर्देशक म्हणून कार्य केले त्यात सध्या महाराष्ट्रात कार्यरत असेलेल्या १०० वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना प्रशिक्षण त्यांनी दिले आहे.
२०१६ सालीच त्यांची विभागीय वनाधिकारी म्हणून पदोन्नती झाली. भारत-अमेरिका संयुक्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत अमेरिकेतील वनप्रशिक्षणाचा अभ्यासदौरा करणेसाठी देखील जाधव यांचा भारतीय चमूमधून सहभाग होता. त्यांच्या नाविन्यपूर्ण कामाबाबत मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन २०१९ साली सन्मान देखील करण्यात आला आहे. २०२१ साली केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत आय. एफ. एस. मध्ये त्यांची पदोन्नती झाली आहे.
रोहा सहाय्यक वनसंरक्षक विश्वजीत जाधव यांच्या बदलीनंतर दि. १० सप्टेंबर २०२४ पासून रोहित चौबे यांनी रोहा सहाय्यक उपवनसंरक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे. चौबे २०१५ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वनविभागात नियुक्त झाले असून धाराशिव येथे सामाजिक वनीकरण व नांदेड येथे प्रादेशिक वनविभागात त्यांनी कार्य केले आहे, परंतु रोहा येथे येण्यापूर्वी जास्तीत जास्त वनविभागाच्या सामाजिक वनीकरण विभागामध्ये त्यांनी काम केले आहे.
ठाणे वनवृत्तातील रायगड जिल्ह्यात दक्षिणे कडील रोहा, माणगांव, तळा, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन व मुरूड या आठ तालुक्यांचा समावेश रोहा वनविभागाचे कार्यक्षेत्रात होतो. सदरचे क्षेत्र पश्चिम घाट क्षेत्रात येत असून ते जैवविविधतेने अतिशय समृध्द आहे. वनविभागाच्या उत्तरेला रायगड जिल्ह्यातील अलिबाग वनविभागाचे क्षेत्र, पुर्वे ला पुणे व सातारा जिल्ह्यातील अनुक्रमे भोर स्वतंत्र उपवनविभाग व सातारा वनविभागाचे क्षेत्र असून दक्षिणेला रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या स्वतंत्र उपवन विभागाचे क्षेत्र आहे.
पश्चिमेला ७३ कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. संपुर्ण क्षेत्र डोंगराळ व दुर्गम आहे. डोंगराळ भागाची समुद्र सपाटी पासून सरासरी उंची ६१० मी. इतकी आहे. रोहा वन विभागामध्ये एकूण ८९५ महसूली गांवे आहेत. त्यापैकी वनक्षेत्र असलेल्या गावांची संख्या ५९२ असून, या विभागाचे भौगौलिक क्षेत्र ३४४४.३१ चौ. कि.मी. आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading