रोहा तालुक्यातील इंग्रजी क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या स्वामी विवेकानंद शिक्षण संवस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल चणेरा येथील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना मोफत १०८ सायकलचे वाटप करण्यात आले आहे.
खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार तथा युवा नेते अनिकेत तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून २ एप्रिल रोजी इयत्ता ७ वी ते १० वीच्या मुलीसाठी १०८ या सायकलींचे वाटप करण्यात आले. ग्रामीण आणि दुर्गम भागातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना शाळेच्या प्रांगणात यावेळी रामचंद्र सकपाळ पंचायत समिती रोहा उप सभापती यांच्या प्रमुख उपस्थितीत या सायकलींचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी पांडुरंग कोंडे अध्यक्ष चणेरा विभागीय कुणबी समाज, हसमुख शेठ जैन, शाळेचे चेअरमन तसेच रोहा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, नितीन डबीर सरपंच ग्राम.पंचायत न्हावे, अतिश मोरे सरपंच खांबेर ग्राम पंचायत, मुजमीन गिते सरपंच ग्रुप ग्रा. प. खैरे खुर्द,देविदास कांडणेकर ज्येष्ठ नेते माजी सरपंच, महादेवखार मा. प्रशांत मांडलेकर सामाजिक कार्यकर्ते, संतोष भौड माजी सरपंच ग्राम पंचायत सारसोली, अमित साळवकर ग्रामपंचायत सदस्य खैरेखुर्द, तुळशीराम पवार माजी सरपंच चणेरा, गणेश भगत अध्यक्ष रोहा तालुका शेतकरी प्रतिष्ठान, गणेश आंब्रे ग्रामपंचायत सदस्य खांबेरे,अभिजित भोईर पोलीस पाटील टेमघर, रवींद्र आयरे पोलीस पाटील बिरवाडी, किशोर मोरे ग्रामपंचायत सदस्य चनेरा सह पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा ग्रामस्थ, शिक्षक वर्ग आदी विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.