बीपीसीएलच्या सीएसआर निधीतून रोहा अष्टमी नगरपरिषदेतील ९ शाळांमध्ये ११० संगणक आणि ६० स्मार्ट डिजिटल बोर्ड्स बसवण्यात आले. डॉ. सी. डी. देशमुख माध्यमिक विद्यालयात या उपक्रमाचा शुभारंभ महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाला. त्या म्हणाल्या की, “ही केवळ सुरुवात असून भविष्यात आणखी आधुनिक शिक्षण सुविधा शासकीय शाळांमध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे.”
मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले की, खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. “खासगी शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षण हे मराठी व सेमी इंग्लिश शाळांमध्येही मिळावे, यासाठी हे पाऊल उचलले आहे,” असे त्या म्हणाल्या. शैक्षणिक क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या योजनेअंतर्गत सुमारे १ कोटी ९० लाख रुपये खर्च करून कॉम्प्युटर लॅब्सही उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘क वर्ग’ मधील सर्व शाळांना एकाच वेळी डिजिटल शिक्षणाची सुविधा मिळाल्याने रोहा नगरपरिषद ही असा उपक्रम राबवणारी पहिली नगरपरिषद ठरली आहे.
यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी रोहा-अष्टमी नगरपरिषद,अजयकुमार एडके, शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, रोहा अष्टमी नगरपरिषदचे सर्व अधिकारी, कर्मचारी वृंद , विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.