रोहा: भातसई येथिल श्री महादेवीचा यात्रा उत्सव ११ व १२ एप्रिल रोजी; भक्ताला गळ लावण्याची परंपरा

Bhatsai Yatra.bagad3
कोलाड (श्याम लोखंडे) :
रोहा तालुक्यात खुप वर्षांपुर्वी भातसई गावातील गुराखी गाई चारण्यासाठी  मिठकेशवर जाळी जवळ गेला असता महादेवी मातें दर्शन दिले सांगीतले मी गावाच्या पुर्व दिशेला मालावर प्रग्रट झाली आहे.महादेवी मातेंच स्वयंभू स्थान आहे.जुनी लोक अशी सांगतात की सरकारी अधिकारी यात्रा उत्सव बंद करण्यासाठी आले असता दैवी साक्षात्कार झाला व यात्रा उत्सवाला सरकारी परवानगी दिली गेली आहे.
यात्रा उत्सव चैत्र पौर्णिमेला दरवर्षी होत आहे. त्यासाठी जर दोन पौर्णिमा आल्यावर जेव्हा सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यत पौर्णिमा आसते त्या दिवसाला उत्सव साजरा केला जातो. तसेच नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्यासाठी नवस फेडण्यासाठी खुप भाविक येत असतात.देवीचा भगत चिंतामणी सखाराम खरीवले आता आहे.
देवीचा वारा खरीवले कुटुंबातील सदस्यांच्या अंगात येतं असतो.हि यात्रा उत्सव दोन दिवस असते. यात्रेला मिठाई, खेळणी,नवसाच्या काट्या वाजतगाजत मिरवणूकने येत असतात यात्रेच वैशिष्ट्य म्हणजे आजही पाठीला गळ टोचून घेतले जातात व त्याची परंपरा देवीच्या आशीर्वादाने सुरू आहे.   
  
हाकेला धावणारी नवसाला पावणारी आदर्शगाव भातसई येथिल श्री महादेवी मातेचा पालखी सोहळा यावर्षी शुक्रवार ११ एप्रिल रोजी दुपरी १२वाजता पालखी मिरवणुकीला भातसई गावातुन येशीच्या मंदिरातुन सुरुवात होणार आहे. पालखी नतंर झोलांबे कोपरे या गावात जाते.त्यानंतर पालखी झोलांबे गाव ,लक्ष्मीनगर येथे फिरवून रात्री७वाजता आदर्शगाव  भातसई गावात घरोघरी  भक्तीमय वातावर्नात  फिरून महादेवी मंदिरात जाते. दुस-या दिवशी शनिवार १२ एप्रिल रोजी महादेवी मातेचा यात्राउत्सवाला सुरुवात होते.सकाळ पासुनभक्त नवस घेऊन मंदिरात वाजत गाजत येत आसतात. सर्व रायगड जिल्ह्यातील व बाहेरून जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून भक्ताचे जनसागर महादेवी आईच्या यात्रेमध्ये सहभागी होतात.
यात्रेचा मुख्य कार्यक्रम गळ लावणे. यावर्षीचा गळ सायंकाळी ५-३०वाजता सुरुवात होणार आहे. एकूण सहा भक्ताना गळ लावले जातात. त्यांपैकी एक भक्तांचा वरचा गळ लाटेला लटकवून एक फेरी फिरवली जाते.या उत्सवासाठी  निडी,कोपरे,झोळांबे लक्ष्मीनगर,वरवडे पाले तर्फे अष्टमी, आरे बुद्रुक, शेजारी गांवातील मानाच्या काट्या येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading