रोहा तालुका कुणबी समाज पदाधिकार्‍यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर !

Roha Kunabi
कोलाड ( श्याम लोखंडे ) :
कुणबी समजोन्नोती संघ मुबंई संलग्न ग्रामीण शाखा रोहा तालुका स्तरावर अध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच समाज नेते शंकरराव म्हसकर, सुरेश मगर यांच्या प्रमूख उपस्थीत माजी आमदार स्व.पा.रा.सनाप कुणबी भवन येथे सभा आयोजित करण्यात आली होती सदरच्या सभेत तालुका पातळीवर नव्याने नियुक्त्या कऱण्यात आल्या असुन रोहा तालुका कुणबी समाजाच्या अध्यक्षपदी नव्याने रामचंद्र सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली तर सरचिटणीसपदी सतीश भगत यांच्या सह उपाध्यक्षपदी मारूती खांडेकर सर,अनंत थिटे, राजेंद्र शिंदे, रघुनाथ करंजे, गुणाजी पोटफोडे,संतोष खेरटकर,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
रोहा तालुका कुणबी समाजाची सभा मोठ्या उत्साही वातावरणात माजी आमदार स्व.पा.रा. सानप कुणबी समाज भवन रोहा येथे पार पडली यावेळी अध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष शंकरराव म्हसकर, रायगड जिल्हा ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश मगर,रायगड जिल्हा कुणबी समाजाचे उपाध्यक्ष शंकर भगत, रामचंद्र सपकाळ, अमित मोहिते, महेश बामुगडे, दत्ताराम झोलगे,निवास खरीवले, खेळु ढमाल, पांडुरंग कडू,दिलिप आवाद, नरेंद्र सकपाळ,गिजे भाऊसाहेब, सुहास खरिवले,मोरेश्वर खरीवले, मुरलीधर ठमके, बाबुराव बामणे, रामचंद्र चितळकर, गणेश खरीवले, केशव भोकटे,यशवंत मुंढे,प्रकाश शिंदे, विजय पवार , ज्ञानेश्वर दळवी, परशुराम भगत, राम तेलंगे,भाई बामुगडे, सह तालुक्यातील चणेरा विभाग ,धाटाव,कोलाड,ऐनघर,नागोठणे,सोनगाव , मेढा,आरे,खांब, कुडली, गोपाळवड,अशा सर्व विभागातील तसेच सर्व कुणबी समाज ग्रुप मधिल कार्यकरणी आणि प्रमुख तालुका कार्यकारणी पदाधिकारी व कुणबी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थीत होते.
तालुक्यातील कुणबी समाज अधिक बळकट करण्याच्या धरतीवर पदाधिकारी निवडीसाठी सभा घेऊन अध्यक्ष म्हणून रामचंद्र सकपाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तसेच सरचिटणीस म्हणून सतीश भगत,तर मारुती खांडेकर, अनंत थिटे, राजेंद्र शिंदे,रघुनाथ करंजे,गुणाजी पोटफोडे, संतोष खेरटकर,यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.तसेच शशिकांत कडू,यशवंत हळदे , मारुती मालुसरे,यांची सहचिटणीस म्हणून निवड करण्यात आली.त्याच बरोबर सुहास खरीवले यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी कुणबी समाज नेते तथा उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष शंकरराव म्हसकर यांनी समाज संघटनेचे ध्येय धोरणे आणि न्याय हक्कासाठी नवीन पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन अधिक समाज बळकट होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे या विषयावर मार्गदर्शन केले.
सुरेश मगर रायगड जिल्हा ओबीसी अध्यक्ष यांनी जुन्या केमेंटीने ज्या प्रमाणे कुणबी भवन त्यांच्या कार्यकाळात पुर्ण केले माजी अध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे यांनी सर्वांना सोबत घेऊन रोहा तालुक्यातील समाज संघटना टिकून ठेवली आहे. तसेच नवीन नेमणूक केलेल्या पदाधिकारी वर्गाने देखील आपला समाज पुढे कसा एक संघ राहील तसेच समाजातील विविध समस्याचा निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
 शकर भगत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की, समाज भवन उभारण्यात आलेल्या अडचणी कशा प्रकारे दुर केल्या आपण एक संघ राहीलो तर आपण रोहा तालुक्यात सामजिक प्रश्न सोडवू शकतो.
या प्रसंगी सभेचे अध्यक्ष म्हणून शिवरामभाऊ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की, मला समाज सेवा करण्यासाठी तेरा वर्षे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली या कालावधीत सर्व समाज बांधवांनी सहकार्य केलेत त्याबद्दल त्यांनी समाज बांधव यांचे ऋण व्यक्त करत असल्याचे सांगितले तसेच यापुढे हि समाज सेवा करत राहीन असे घटकाला आश्र्वासित केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष रामचंद्र सकपाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, मी समाज एकसंघ ठेवण्यासाठी वचन देतो माझ्याकडून समाज हितासाठी तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून कामे करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे शेवटी सांगीतले.
मोठा उत्साही वातावरणात संपन्न झालेल्या या सभेप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि नव्याने तालुका सांघवर नेमणूक केलेल्या सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा देत त्यांचे उपस्थित मान्यवर तसेच समाज बांधव यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading