कोलाड ( श्याम लोखंडे ) :
रोहा तालुका कुणबी युवक मंडळाच्या अध्यक्षपदी मुकेश भोकटे तर महिला मंडळाच्या अध्यक्षपदी दीपिका दिनेश भगत यांची नियुक्ती करत रोहा तालुक्यात कुणबी युवक मंडळ तसेच महीला मंडळाच्या कार्यकारणीची नव्याने निवड करण्यात आली आहे.
रोहा तालुक्यात अनेक वर्ष कार्यरत असलेल्या रोहा तालुका कुणबी समाजोन्नती संघ संघ मुंबई ग्रामीण शाखा तालुका रोहा शाखेचे कार्यकारणी सभा २९ नोहोंबेर रोजी कुणबी भवन येथे मोठ्या उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली तर आयोजित सभेत कुणबी युवक मंडळ आणि महिला मंडळाच्या कार्यकारणीची नव्याने निवड करण्यात आली.
रोहा तालुका कुणबी समाजाचे अध्यक्ष रामचंद्र सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली सदर सभेस कुणबी समाजाचे ज्येष्ठनेते शंकरराव म्हसकर रायगड जिल्हा ओबिसी सेलचे अध्यक्ष सुरेशजी मगर, मुंबई संघ सल्लागार शिवरामजी शिंदे, तालुका उपाध्यक्ष अनंत थिटे, शंकरराव भगत,बाबुराव बामने,रामचंद्र चितळकर,शिवराम महाबळे, दत्ताराम झोलगे, मारूती खांडेकर,सुहास खरिवले, सतिश भगत मुकेश भोकटे, करंजे गुरुजी,महेश ठाकुर, महेश बामुगडे, पांडूरंग कडू,खेळु ढ़माले,गुनाजी पोटफोडे, निवास खरिवले,यशवंत हलदे, आदी मान्यवर कुणबी समाजाचे पदाधिकारी युवक मंडळांचे पदाधिकारी तसेच महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी सभेच्या सुरूवातील मागिल सभेचे इतिवृत तसेच जमा खर्चाचे वाचन झाल्यानंतर रोहा तालुका युवक कार्यकारीनी निवड या महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली तालुक्यात असणारा बहुसंख्य कुणबी समाज अणि या समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याकरिता युवकांवर येऊन पडलेली जबाबदारी याकरिता कुणबी समाजा करिता तन मन धनाने काम करनारी युवा पिढी पुढे येणे गरजेचे आहे.
यासाठी समाजाने कर्तुत्वान शिलेदार यांची निवड केली . तालुका युवक अध्यक्षपदी धाटाव ग्रुप मधून धाटाव गावचे सुपुत्र सक्षम नेतृत्व समाज कार्याची आवड आसणारे मुकेशशेट भोकटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी प्रशांत महाले, शैलेश बाईत, सरचिटनीस रविंद्र शिंदे, खजिनदार महेश तुपकर,सह पदाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आली.
तसेच महिलेने चूल मुल संभाळावे हा जमाना आता गेला असुन माझा समाजातील महिलांचे प्रश्न सोडवण्याकरिता मला पुढे आले पाहीजे म्हणत कुंणबी रणरागीनी पुढे आल्या आहेत. तालुका महिला अध्यक्षपदी दिपिका दिनेश भगत, ऊपाध्यक्षपदी वीणा विनायक चितळकर, आशा रंजन शिंदे, गीता गोपिनाथ गंभे, विशाखा विजय राजिवले, सरचिटणीस शिल्पा नंदकुमार मरवडे, सहसचिव सपना दिनेश रटाटे, सल्लागार जिद्न्यासा जितेंद्र तुपकर, सल्लागार नंदा बबन म्हसकर, सल्लागार प्राची प्रशांत राऊत सह कर्तबगार कर्तव्यदक्ष महिलांची यावेळी सर्वानुमते निवड करण्यात आली तर प्रसंगी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे उपस्थित समाज बांधव यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी सभेपुढे महत्व पूर्ण विषय गाजला तो कुणबी समाजाच्या जातीच्या दाखल्याचा आणि त्यामूळे विध्यार्थ्याचे होणारे नुकसान सदर विषय हा कुंणबी नेत्यानी गांभीर्यानी घेतला असुन भविश्याच्या काळात या विषयावर तोडगा काढण्या करिता प्रयत्न शील राहू असे संगितले. आज रोहा तालुक्यात जातीवंत कुंणबी आहेत हे कोणी नाकारु शकत नाही मात्र शासनाच्या जाचक अटीमुळे दाखला मिळत नाही या अटी शिथिल व्हाव्यात अशी मागणी समाजाची आहे दाखल्याचा संदर्भात अभ्यास पूर्ण मार्गदर्शन शंकरराव म्हसकर तसेच सुरेश मगर यानी केले.
सभा ही उत्साहात पार पडली जमलेली बहुसंख्य ऊपस्थीती पहाता समाज आता सामजिक प्रस्न सोडवन्याकरिता कुठे तरी जागृत झाला असल्याचे दिसले तर रोहा तालुका माजी अध्यक्ष शिवराम शिंदे यानी गेली १० वर्ष समाज संघटने साठी दिलेले योगदान त्यांच्या कार्यकाळात झालेले कुंणबी भवन याचे कुठेतरी चिज होत असल्याचे संघटन वाढीवरुन दिसून येत आहे.