रोहा अंजुमन उर्दू हायस्कुलमध्ये जागतिक कांदळवन दिन साजरा

urdu-school-roha
कोलाड ( श्याम लोखंडे ) : रोहा वन विभाग, अंजुमन उर्दू हायस्कुल व रोहा एज्युकेशनल अँड वेल्फेअर असोसिएशन इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्युनियर कॉलेज ( सायसन्स ) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अंजुमन ए इस्लाम जंजीरा उर्दू हायस्कुलमध्ये जागतिक कांदळवन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कांदळवन दिनाचे औचित्य साधून अंजुमन हायस्कुल अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा, निबंध, चित्रकला स्पर्धा व विविध स्पर्धा पार पडल्या. विद्यार्थी वर्गात पर्यावरण विषयी प्रेम व कांदळवन संदर्भात अधिकाधिक माहिती मिळावी म्हणुन हा दिवस साजरा करण्यात येते.
वन विभाग खात्यातील कांदळवन कक्षाचे मसूद मुखत्यार मनियार प्रकल्प सहयोगी यांनी विद्यार्थ्यांना कांदळवन व समुद्री जैवविविधता यांच्या बद्दल माहिती दिली. नियोजित विविध स्पर्धेत १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले. अंजुमन हायस्कुलचे मुख्याध्यापक वसीम सातारेकर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची साथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading