रेवदंडा पोलिस ठाण्यात सहाय्यक फौजदारावर हल्ला; दोन आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल

Police Marhan

अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
राज्यात पोलिसांना मारहाण केल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत असतात. अशातचं आता रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस ठाण्यातील एक मोठी बातमी समोर आली आहे. रेवदंडा पोलिस ठाण्या कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार दिनेश पिंपळे हे पोलीस बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध कारवाई करीत असताना मुरुड तालुक्यातील बोर्ली विभागातील दोन आरोपींनी धक्काबुक्की करून मारहाण करीत जखमी केल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत रेवदंडा पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजे बोर्ली ते साळाव तपासणी नाकादरम्यान आरोपी झीशान उलहक वसीम सातारकर याने त्याच्या ताब्यातील पिकअप टेम्पो वाहतुकीला अडथळा येईल अश्या पद्धतीने उभा केला होता. याची माहिती सहाय्यक फौजदार दिनेश पिंपळे यांना प्राप्त होताच ते घटनास्थळी गेले. सहाय्यक फौजदार दिनेश पिंपळे यांनी आरोपी झीशान उलहक वसीम सातारकर व सर्वेश सुनिल ठाकूर या दोघांना पिक अप टेम्पोसहित रेवदंडा पोलिस ठाण्यात आणले असता त्यावेळी त्या दोघांनी फौजदार दिनेश पिंपळे यांच्याशी वाद घालून अरेरावीची भाषा वापरत होते, त्यांना पिंपळे यांनी बाहेर जाण्यास सांगितले.
या दरम्यान पिंपळे हे पिकअपमधून गाडीची कागदपत्रे आणण्यासाठी पोलिस स्टेशन इमारतीच्या बाहेर गेले. पिंपळे हे शासकीय गणवेश मध्ये असून ते शासकीय कर्तव्य बजावत आहे याची माहिती असताना देखील आरोपी झीशान उलहक वसीम सातारकर व सर्वेश ठाकूर यांनी त्यांचे शर्ट खेचून हाथाबुक्काने मारहाण केली. तसेच हातातील दगड डावे हाताच्या त्यांच्या डाव्या हाताच्या पंजावर तसेच उजव्या हाताला उजव्या हाताचे मनगटावर खरचटले आहे. तसेच पिंपळे यांच्या अंगावर असणारे शासकीय गणवेशवर असलेले नाव पट्टी,नंबर प्लेट व शर्टचे बटने तोडुन नुकसान करुन फिर्यादी हे शासकीय गणवेशात शासकीय कर्तव्य बजावत असताना ते कर्तव्य पार पाडण्या पासुन धाकाने परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.28/2025, भारतीय न्याय सहीता 2023 चे 123, 121(1),324(2),3(5),प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलिस निरीक्षक दत्तू गांगुर्डे हे करीत आहेत.
——————————————–

यापूर्वी सुद्धा रायगड जिल्ह्यात पोलिस अधिकारी कर्मचारी यांच्या वर हल्ले झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आरोपी हे थेट पोलिस कर्मचारी तथा इतर शासकीय कर्मचारी यांच्यावर हल्ला करीत असताना त्यांना कोणाचा वरदहस्त मिळत असतो. याचा शोध रायगड पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे घेऊन कठोर कारवाई करीत बीमोड करतील का? असाही सवाल रेवदंडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार दिनेश पिंपळे यांना झालेल्या मारहाणी नंतर उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading