रेल्वे पोलिसाची आत्महत्या नव्हे, दोन आज्ञताकडून केलेला मर्डर

रेल्वे पोलिसाची आत्महत्या नव्हे, दोन आज्ञताकडून केलेला मर्डर
रायगड ( अमुलकुमार जैन ) : 
रायगड जिल्ह्यातील पनवेल रेल्वे पोलिस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असणारे विजय चव्हाण यांची दोन अज्ञात आरोपी यांनी गळा दाबून हत्या केली आहे. मात्र ही हत्या नसून अपघात भासावा म्हणून अज्ञात आरोपींनी त्यांचा मृतदेह रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलसमोर ढकलून दिले असल्याची घटना घडली आहे. याबाबत वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात दोन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,बुधवारी (दि.1) पहाटे 5.25 ते 5.32 च्या सुमारास दोन अज्ञातांनी विजय चव्हाण यांना लोकल ट्रेनसमोर ढकलल्याचे लोकल मोटरमनने सांगितले. त्यानंतर मोटरमनने पोलिसांना संपर्क केला. लगेचच वाशी रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या तुकडीला दोन स्थानकांदरम्यान विजय चव्हाण यांना बेशुद्ध अवस्थेमध्ये दिसले. वाशी महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी विजय चव्हाण मृत असल्याचे पोलिसांना सांगितले.
विजय रमेश चव्हाण असं हत्या झालेल्या ४२ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून ते पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी मंगळवारी चव्हाण यांची साप्ताहिक सुट्टी होती. बुधवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास चव्हाण यांचा मृतदेह घणसोली ते रबाळे रेल्वे स्टेशनच्या मध्ये आढळून आला होता. आरोपींनी ठाण्याहून वाशीच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रेनसमोर चव्हाण यांचा मृतदेह फेकून दिला होता.
याबाबतची माहिती मोटरमनने आरपीएफ आणि वाशी रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मृत व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून पनवेल पोलीस ठाण्यात काम करणारे हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण असल्याचं समोर आलं. तसेच त्यांच्या गळ्यावर गळा दाबून हत्या केल्याच्या खुणा आढळल्या. तसेच त्यांचं शवविच्छेदन केलं असता त्यांची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं.
प्राथमिक तपासावरुन विजय चव्हाण हे घटनेदरम्यान ऑफ ड्यूटी होते. त्यांच्या अंगावर पोलिसी गणवेश नव्हता. दोघांनी गळा दाबून चव्हाण यांची हत्या केली. त्यानंतर चव्हाण यांना आरोपींनी रबाळे आणि घणसोली रेल्वे स्थानकांदरम्यान येणाऱ्या धावत्या लोकलसमोर ढकलून दिले. आरोपी कोण आहेत, या हत्येमागे त्यांचा काय उद्देश होता हे अजूनही स्पष्ट झालेला नाही अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. विजय चव्हाणांच्या मृतदेहाजवळ त्यांचा मोबाईल फोन आढळला. तपासाअंतर्गत पोलिसांनी फोन ताब्यात घेतला आहे. त्याशिवाय पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करायला सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading