PEN न्यूज ऑनलाइन टीम :
Railway Recruitment Board म्हणजेच RRB ने भारतीय रेल्वेमध्ये ‘मिनिस्ट्रीअल अँड आयसोलेटेड श्रेणीमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी एकूण १०३६ इतक्या रिक्त जागा भरण्यात येणार असून अंतिम मुदत ६ फेब्रुवारी २०२५ पर्यन्त असणार आहे. इच्छूक उमेदवार rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ अर्ज करू शकतात.
रिक्त जागा तपशील
RRB मिनिस्ट्रीअल अँड आयसोलेटेड (RRB MI) श्रेणीतील भरती प्रक्रियेंतर्गत ज्युनियर स्टेनोग्राफर, ज्युनिअर ट्रान्सलेटर, स्टाफ आणि वेल्फेअर इंन्सपेक्टर, चिफ लॉ असिस्टंट, कुक, PGT, TGT, फिजिकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर (पुरुष आणि महिला), असिस्टंट मिस्ट्रेस (ज्युनिअर स्कुल), संगीत डान्स मिस्ट्रेस, लॅबरोटरी असिस्टंट(स्कुल, मेन कुक, आणि फिंगरप्रिंट एक्सामिनर इत्यादी पदांसाठी भरती केली जाणार आहे.
पात्रता निकष
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान १८ वर्षांचा असावा. कमाल वयोमर्यादा विशिष्ट पोस्टच्या आधारावर बदलते, उच्च मर्यादा ४८ वर्षे आहे.
पदाच्या आवश्यकतेनुसार अर्जदारांनी त्यांचे १२ वी, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे. त्यांच्या अंतिम परीक्षेच्या निकालाची वाट पाहणारे उमेदवार अर्जाच्या अंतिम मुदतीपूर्वी निकाल घोषित केल्याशिवाय अर्ज करण्यास पात्र नाहीत.
असा करा अर्ज
-
स्टेप १: : http://www.rrbapply.gov.in येथे अधिकृत RRB वेबसाइटला भेट द्या.
-
स्टेप २: एक अद्वितीय वापरकर्तानाव आणि पासवर्ड तयार करण्यासाठी एक-वेळची (One time) नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
-
स्टेप ३: तुमचे युजर नेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
-
स्टेप ४: “RRB मिनिस्ट्रीअल अँड आयसोलेटेड श्रेणी भरती २०२५” या शीर्षकाच्या लिंकवर क्लिक करा.
-
स्टेप ५: अचूक वैयक्तिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक तपशीलांसह अर्ज भरा, नंतर सबमिट करा.
-
स्टेप ६: भरलेला अर्ज डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवा.