सॅटॅलाइट रोटरी इंटरनॅशनल क्लब ,रोहा रोटरी क्लब व डॉ. आर.एन.पाटील यांचे सुरज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शिव गणेशोत्सव मंडळ सभागृहात रविवार 02 मार्च रोजी सरपंच सुप्रिया संजय महाडिक, सहा.पो.नि.सचिन कुलकर्णी, सुरज हॉस्पिटलचे डॉ. उदय पाटील,भाजप रा.जि.कार्यकारणी सदस्य मारुती देवरे, क्लबचे नागोठणे अध्यक्ष सचिन मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी, उपचार व मोफत औषधे वाटप शिबिरात रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे सांगून नागोठणे शहरात अत्याधुनिक रुग्णालयाची गरज असल्याचे प्रतिपादन भाजप रा.जि. उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी केले.
सचिन मोदी यांचे विशेष सहकार्य लाभलेल्या तसेच 250 रुग्णांनी लाभ घेतलेल्या या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी वैकुंठ पाटील यांनी सांगितले की, आज विविध प्रकारचे आजार वाढत असून त्यामधून व्यायाम पटूही सुटत नाहीत. त्यामुळे आपली दैनिक तपासणी करणे महत्वाची असून त्यासाठी आशा शिबिरांची आवश्यकता नक्कीच आहे.ते शिबीर आज सचिन मोदी क्लबच्या माध्यमातून महत्वाचे काम केले आहे.
आपल्या आरोग्यासाठी शिबीर व सरकारी योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन करून नागोठणे येथे भव्य रुग्णालयाची आवश्यकता तसेच येथील सरकारी रुग्णालयाची सुधारणा करणे गरजेचे असल्याचे शेवटी पाटील यांनी सांगितले. डॉ.सुनील पाटील यांनी आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. डोके शांत ठेऊन आरोग्य सांभाळण्यचा सल्ला दिला.
डॉ.उदय पाटील यांनी कोणीही वंचित न राहता आरोग्यासाठी सरकारी योजनेचा लाभ घ्या. आरोग्याबाबत आम्ही लोकांपर्यंत शिबिरा मार्फत पोहचत असतो आम्हाला सेवेची संधि द्या. डॉ.शेळके यांनी या शिबिराचा फायदा घेत आरोग्याकडे वेळीच लक्ष देण्याची सूचना केली. सचिन कुलकर्णी यांनी या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सांभाळा,त्याची काळजी घेत वेळीच उपचार करावा.शरीरासाठी व्यायाम व सकस आहार हा उत्तम उपाय आहे.सचिन मोदी यांना यासारखे शिबीर भरावून समाज सेवा करण्यासाठी सुभेच्छा दिल्या.
मारुती देवरे यांनी लोकांच्या रोग्यासाठी घेतलेल्या या शिबीराचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन केले.आपल्या प्रस्तावनेत सचिन मोदी यांनी अशा शिबिराची आपल्या विभागात गरज असल्याचे सांगून अशा प्रकारचे शिबीर सतत भरविणार असून आपली सेवा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी भाजपा जि.उपाध्यक्षा श्रेया कुंटे,भाजपा ता.सरचिटणीस आनंद लाड, गडब सरपंच मंगेश पाटील, प्रियदर्शनी संस्थेचे अध्यक्ष सिराज पानसरे, ग्रा.पं. सदस्या अमृता महाडिक, विना मोदी डॉ. सुनील पाटील, क्लबचे डॉ.रोहिदास शेळके व गौतम जैन,विवेक रावकर,सूरज रुग्णालयचे विनोद म्हात्रे,धनराज सुळे,राज शेलार,रींकल घोटवळ यांच्यासह डॉ अभिषेक शहासने,दळवी गुरुजी, प्रशांत गोळे, प्रवीण जैन तसेच रुग्ण व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद नागोठणेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिन मोदी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सचिन मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबचे पदाधिकारी सदस्यांनी तसेच रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी यांनी अपार मेहनत घेतली.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.