जेष्ठ नागरिक माॅर्निग कट्टा उरण व एस्.टी डेपो उरण या ठिकाणी मतदार जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी केंद्र प्रमुख निर्मला घरत , केंद्र प्रमुख बबन पाटील ,समता ठाकूर,संजय होळकर,संजय पाटील, संगिता गावंड यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिले, प्रकाश पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले,संजय होळकर यांनी स्विप तर्फे स्वागत केले तर बबन पाटील यांनी मतदानाचे महत्त्व सांगितले.
यावेळी कुलकर्णी , दर्णे, प्रकाश पाटील यांनी आपली मते मांडली, निर्मला घरत यांनी माहिती दिली,तर समता ठाकूर यांनी आभार मानले.
यावेळी आनंद बुधे, नितीन पडते, दिनेश घरत, आदि मंडळी उपस्थित होती. यावेळी मी मतदान करणार या बोर्ड वर सह्यां करण्यात आले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.