कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघातील महायुतीतील घटक पक्ष भाजप, शिवसेना शिंदे गट व आर पी आय पक्षाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील निवडूण आलेले नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री खासदार धैर्यशिल पाटील, आमदार तथा कॅबिनेट मंत्री भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर,आमदार रवि पाटील, आमदार महेश बादली व आमदार महेंद्र दळवी यांचा सत्कार सोहळा महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुंटूब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दि. १७ जानेवारी २०२५ रोजी कर्जत येथील सीबीसी लॉन ( रॉयल गार्डन ) येथे पार पडला आहे.
या सत्कार सोहळ्याला मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे, महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण, विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार विक्रांत पाटील, कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सुरेश लाड व माजी आमदार देवेंद्र साटम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
यावेळी मंचावर शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख संतोष भोईर, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, संपर्क प्रमुख विजय पाटील, पंकज पाटील, शिवराम बदे, संभाजी जगताप, तालुका प्रमुख सुदाम पवाळी, अंकुश दाभणे, भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आविनाश कोळी, दिपक बेहरे, वसंत भोईर, राजेश भगत, मंगेश म्हसकर, आर पी आय चे जिल्हाअध्यक्ष नरेंद्र गायकवाड, राहुल डाळिंबकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खालापुर तालुका औद्योगिक क्षेत्र आहे आणि कर्जत तालुका हा पूर्णपणे ग्रीनझोन असल्याने हा ग्रीन इंडस्टिज बेल्ट म्हणून ओळखला जात आहे. कर्जत तालुक्यामध्ये कोणती इंडस्ट्री या ठिकाणी नाहीये आणि आम्हाला आणायची नाही आम्हाला जे आणायचं आहे ती ग्रीन इंडस्ट्रीज. या तालुक्यामध्ये उभी राहिली पाहिजे. कर्जत तालुक्यातील धबधबे असणारे फार्म हाऊस हे सारेच एकत्र करून. भविष्यामध्ये कर्जत तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित व्हावा. तसेच कर्जतचा असणार उपजिल्हा रुग्णालय हे पन्नास बेडचा आहे. ते दोनशे विस बेडचे रूग्णालय मंजूर करावे. तसेच नेरळमध्ये सुद्धा नवीन विस्तार होत असल्याने, त्या ठिकाणी सुद्धा उपजिल्हा रुग्णालय आम्हाला हवंय अशी मागणी कर्जत -खालापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुंटूब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना मागणी केली आहे.
————————————————-
महाराष्ट्र राज्याचा आरोग्य मंत्री म्हणून मला सत्कार सोहळ्यासाठी कर्जत येथे अंमत्रित केल्या प्रमाणे कर्जत येथे आलो आहे. कर्जत मधिल उपजिल्हा रूग्णालया संदर्भातील सुचना तुम्ही केली आहे. आता महेंद्र थोरवे तुम्ही घाबरू नका आता तुमचा मित्र आरोग्य मंत्री आहे. पुढच्या वेळी मी पुन्हा येईल तो कर्जत उपजिल्हा रूग्णालयाच्या उद्घाघटन सोहळ्यासाठी येईल.
…प्रकाश आबिटकर, आरोग्य व कुंटूब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य,
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.