रायगड प्रेस क्लब व रायगड प्रेस क्लब संलग्न असलेल्या खालापूर प्रेस क्लब चा 20 वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात खोपोली येथील महाराजा मंगल कार्यालयात संपन्न झाला.
या सोहळ्याचे उद्घाटन खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे व मुख्य विश्वस्त व मराठी पत्रकार परिषद तथा संस्थापक रायगड प्रेस क्लब एस एम देशमुख यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, न्यूज 18 लोकमत चे वृत्त निवेदिक विशाल परदेशी, दै सागरचे संचालक प्रशांत जोशी ,परिषदेचे माजी अध्यक्ष शरद पाबळे, जिल्हा अध्यक्ष मनोज खांबे, मराठी परिषदेचे कोकण सचिव अनिल भोळे, कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे, उपाध्यक्ष मोहन जाधव,माजी अध्यक्ष अभय आपटे, भारत रंजणकर, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांच्या सहित राजकीय व अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्धापन दिनानीमित्त रायगड प्रेस क्लब कडून रायगड जिल्ह्यातील पत्रकार तसेच खालापूर खोपोली परिसरातील पत्रकार व विविध क्षेत्रात नावीन्य पूर्ण कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. रायगड प्रेस क्लब कडून यात आचार्य अत्रे राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार दै सागर च्या संपादिका श्रीमती शुभदा जोशी यांना व जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ पत्रकार आनंद जोशी , निशिकांत जोशी स्मृती पुरस्कार विजय कडू , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला पत्रकार पुरस्कार स्वाती घोसाळकर, पत्रकार धम्मशील सावंत यांना दीपक शिंदे स्मृती पुरस्कार, स्व. प्रकाश काटदरे स्मृती निर्भीड पत्रकारिता पुरस्कार कमलेश ठाकूर , स्व. जनार्दन पाटील स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार राजेंद्र जाधव , स्व. संतोष पवार स्मृती पत्रकार पुरस्कार समाधान दिसले , स्व सचिन पाटील स्मृती पत्रकार प्रकाश कदम यांना, सागर जैन , उत्तम तांबे , कुमार देशपांडे यांना व रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार म्हणून उत्तम तांबडे , गणेश चोडणेकर यांना खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी खालापूर प्रेस क्लब कडून खालापूर खोपोली व खालापूर तालुक्यात राजकीय, वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, प्रशासकीय क्षेत्रासह अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यात आदर्श सामाजिक पुरस्कार – दिनेश जाधव , आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार – माजी नगरसेविका मानसी काळोखे , आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार – नायब तहसीलदार विकास पवार , आदर्श राजकीय व्यक्ती पुरस्कार – प्रफुल्ल विचारे ,आदर्श व्यवसाहिक काशी होम्स पुरस्कार – द , आदर्श सरपंच महेश पाटील , आदर्श शिक्षक श्रीकांत खेडकर , आदर्श वैद्यकीय सेवा सुमित जाधव , व डॉ स्वाती भिसे , जीवन गौरव पुरस्कार बाळाराम म्हात्रे आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार – ग्रुप ग्रामपंचायत वडवळ यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी बोलतांना पत्रकारांच्या समस्या बाबत लोकप्रतिनिधी जागरूक असून , केंद्र स्तरावर पत्रकार संरक्षण कायदा पारित होण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच रायगड प्रेस क्लब व खालापूर प्रेस क्लब ही पत्रकारांची संस्था सह एक आदर्श सामाजिक संस्था असल्याचे गौरव उद्देगार काढले .पत्रकारांच्या पाठपुराव्यामुळेच विविध प्रश्न मार्गी लागल्याचे ही खासदार तटकरे यांनी येथे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य विश्वस्त व मराठी पत्रकार परिषद तथा संस्थापक रायगड प्रेस क्लब एस एम देशमुख यांनी रायगड प्रेस क्लबचा कार्याचा आढावा घेत जिल्हा व खालापूर प्रेस क्लब च्या कार्याचे कौतुक केले .तसेच माजी अध्यक्ष मनोज खांबे , व नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांचे कार्याचे कौतुक केले .पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार आरोग्य विमा, अधिस्वाकृती, पेन्शन योजना अशा विविध प्रलंबित विषयावर वक्त्यव्य केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यमान अध्यक्ष मनोज खांबे यांनी केले .यावेळीपरिषदेचे राज्य अध्यक्ष मिलींद आष्टीवकर , विशाल परदेशी, शरद पाबळे, यांनी मार्गदर्शन केले . सूत्रसंचालन जगदीश मरागजे व आभार प्रदर्शन नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी मानले तसेच या कार्यक्रमात पुरस्कार सोहळ्यात महेशबुवा देशमुख यांचा बहारदार मराठी,हिंदी गीतांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर सदाबहार गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले तर साऱ्यांनीच याचा आनंद लुटला तर हा सोहळा यशस्वी करण्यासाठी रायगड प्रेस क्लब चे सर्व पदाधिकारी , खालापूर प्रेस क्लबचे प्रशांत गोपाळे, अनिल पाटील, एस.टी.पाटील, रविंद्र मोरे, समाधान दिसले, काशिनाथ जाधव, संतोषी म्हात्रे, राज साळुंखे, नवज्योत पिंगळे, भाई जगन्नाथ ओव्हाळ, आदींनी मेहनत घेतली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.