रायगड टॅलेन्ट सर्च (RTS) परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी

रायगड टॅलेन्ट सर्च (RTS) परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी
माणगांव ( राम भोस्तेकर ) :  
रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक आदरणीय  पूनिता गुरव मॅडम यांच्या प्रेरणेतून शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वतयारी रायगड टॅलेंट सर्च RTS हे जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सुरू करण्यात आलेली असून  रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यातून 3500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यासाठी रजिस्ट्रेशन केलेले आहे.
 शनिवार दि.25/10/2024 रोजी  RTS चा पेपर क्रमांक०३ रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विविध केंद्रांवर घेण्यात आला. माणगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप जठार आणि गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांच्या मार्गदर्शनाखाली तळाशेत , माणगाव आणि गोरेगाव या  3 परीक्षा  केंद्रावर 139 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी सहभाग नोंदविला.
निकाल  
परीक्षा केंद्र तळाशेत
1. आयुष सुधीर निकम 186 भूवन
2. स्वरुप किरण बडेकर 146 निवी
3. ओवी मंगेश शिंदे 144 कोल्हाण
4. श्रावण सुधीर गव्हाणे 142 कोल्हाण
5. आर्या सुबोध कजबजे 134 तळाशेत
परीक्षा केंद्र माणगाव 
1.सार्थक अंकुश जाधव 234 पाणोसे कोंड 
2.स्वरा संतोष खानविलकर 208 भाले
3. प्रथमेश नरेश जाधव 202 पाणोसे कोंड
4. क्षितिज विजय आरसे 202 पेण/तळे
5. अवनी संदेश कदम 180 कोस्ते बुद्रुक
परीक्षा केंद्र गोरेगाव
1. अक्षरा वैभव सुर्यवंशी 280 भिंताड
2. . श्रीश दत्ताराम शिंदे 250 भिंताड
3. आदित्य दादासाहेब निंबाळकर 234 नागाव 
4. निहान अर्जुन गावडे 192 वडगाव कोंड 
5. काव्या परेश गायकवाड 186 वडवली कोंड
या परीक्षेसाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक अरविंद मोरे,मंगेश म्हस्के,अमोल गुरव,अशोक माळवे, सुधा मोरे,आनंद गायकवाड, संतोष उभारे,महादेव बांगर,भावना कुसुमकर,संजय गावडे,वैभव सूर्यवंशी,प्रकाश खडस,विशाखा डांगे,नेहा जाधव,मंगला भोसले, रुचिता मेहता,माने यांनी केंद्र संचालक व पर्यवेक्षक म्हणून परीक्षा केंद्रांवर उत्तमरीत्या काम करून तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी खूप मोलाचे योगदान दिले. मुकेश भोस्तेकर यांनी तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली.
 ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी व्हावी व मुलांना शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत घवघवीत यश मिळविण्यासाठी RTS ही नवीन संकल्पना राबविली जात आहे. नवजीवन हायस्कूल तळाशेत, अशोकदादा साबळे हायस्कूल माणगाव आणि गोरेगाव मुलगे या शाळांनी सदर परीक्षेसाठी वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्या. यासाठी RTS चे संस्थापक रत्नाकर पाटील, केंद्र प्रमुख कुमार खामकर, शंकर शिंदे, गणेश ढेपे, सर्व जिल्हा ,तालुका,केंद्र कमिटी, सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि पालक यांचे खूप मोलाचे योगदान लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading