PEN न्यूज ऑनलाइन टीम :
रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील कर्जत, नागोठणे, नेरळ, पोयनाड, मांडवा सागरी, रेवदंडा, महाड, वडखळ, गोरेगाव, रसायनी, मुरुड आणि खोपोली या १२ पोलीस ठाण्यांमध्ये एन.डी.पी.एस. अॅक्ट (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act) अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या १५ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आले.
दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी, एकूण ५२ किलो ३९ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ, त्यामध्ये ५० किलो ९९२ ग्रॅम गांजा आणि १ किलो ४७ ग्रॅम चरस, ज्याची एकूण किंमत ₹८,४८,३१८/- (आठ लाख, अठ्ठेचाळीस हजार, अठरा रुपये) इतकी आहे, तो मे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमीटेड (MWML), तळोजा, नवी मुंबई येथे योग्य कायदेशीर प्रक्रिया पार पाडून नष्ट करण्यात आला.
ही कार्यवाही एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ५२ अ (२) नुसार करण्यात आली असून, यावेळी खालील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती:
-
सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड-अलिबाग
-
अभिजित शिवथरे, अपर पोलीस अधीक्षक, रायगड-अलिबाग
-
परशुराम कांबळे, पोलीस निरीक्षक (अति. कार्यभार पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, रायगड-अलिबाग)
-
बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड-अलिबाग