रायगड जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी दरमहा ‘जिल्हा उद्योजक मित्र समिती’च्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद – 2025 या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यासाठी एकूण 2311 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून, यातून 2865 रोजगार संधी निर्माण होणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे करण्यात आले होते.
या परिषदेत उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, महाव्यवस्थापक जी. एस. हरळय्या, स्टेट बँकेचे विभागीय व्यवस्थापक विलास शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील 250 पेक्षा अधिक उद्योजक सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले की, सर्व सामंजस्य करार धारकांना शासकीय कामांना प्राधान्य देण्यात येईल, ज्यामुळे अधिक रोजगार निर्मितीस चालना मिळेल. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात 100% उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल जिल्हा उद्योग केंद्र आणि सर्व बँकांचे त्यांनी अभिनंदन केले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.