रायगड जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलत असताना महाविकास आघाडीचा प्रभाव संपत चाललेला दिसून येत आहे. मात्र, महायुतीतील सततची भांडणे आणि भाजपचे ऑपरेशन ‘लोटस’ पाहता प्रशासक असलेल्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या तसेच नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना विरूध्द भाजप विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत होईल अथवा महाविकास आघाडीतील एखादा पक्ष संपूर्ण महाविकास आघाडीची सूत्र घेऊन चौरंगी लढतीचे चित्र रेखाटेल असे अंदाज काढता येत असताना भाजपने पुढाकार घेतल्यास महायुतींतर्गत रायगड जिल्हा परिषद, जिल्हयातील पंचायत समित्या व नगरपालिकां यामध्ये निवडणूका बिनविरोध करून सामंजस्य निर्माण केले जाईल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकेल काय, याबाबत राजकीय समीक्षकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये राजकीय दलबदलू पणामुळे ‘लाडू एका टोपलीतून दुसऱ्या टोपलीमध्ये ठेवताना बुंद्या गळून लाडूचे वजन घटतेय’ ही बाब राजकीय नेत्यांकडून दूर्लक्षित झाली असल्याने प्रत्येक पक्षाचे अस्तित्व मतदार आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून कायम ठेवले गेले तरी त्याच पक्षांच्या जिल्हा, प्रदेश व केंद्रीय कार्यकारिण्यांकडून या निष्ठावंत कार्यकर्ते व मतदारांना ढूंकूनही विचारात घेतले जात नसल्याने राजकीय समीकरणे बदण्यासाठी या असंघटित मतदार व कार्यकर्त्यांकडून छुपे प्रयत्न होऊ लागले आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार व विधानसभेचे इच्छुक तसेच पराभूत उमेदवार आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि नगरपालिकेचे इच्छुक उमेदवार भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित झाले आहेत. येत्या काळात या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे भाजपप्रवेश होऊ घातले असताना महायुतींतर्गत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे पालकमंत्री पदासाठी संघर्ष वाढीस लागले आहेत. याचप्रकारचे संघर्ष महाविकास आघाडी सरकारच्या काळातही राज्याने व रायगडच्या जनतेने अनुभवले आणि त्यातूनच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले होते.
यावेळी भाजपप्रणित महायुतीसरकारमध्येदेखील संघर्षाचा मुद्दा आणि व्यक्ती त्याचे असल्याने आणि यावेळी दोन्हीही कॅबिनेट दर्जाचे मंत्री असल्याने संघर्षाची तीव्रता कमी होण्याची शक्यता दुरावली आहे. परिणामी, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असा पवित्रा घेण्याऐवजी भाजपकडून दोघांचे भांडण अधिककाळ घडून नंतर दोन्ही पक्षांमध्ये तुंबळ प्रतिरोध निर्माण होत निवडणुकांना सामोरे गेल्यावर दोन्ही पक्षांची अतोनात हानी होऊन भाजप प्रमुख पक्ष म्हणून रायगड जिल्ह्यात उदयास येण्याची शक्यता निर्माण होणार आहे. पोलादपूर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषदेच्या दोन गटांतील निवडणूक आणि पंचायत समितीच्या चार गणांतील निवडणूक ही विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार समीक्षण करता केवळ आणि केवळ शिवसेना शिंदे पक्षाच्या ताब्यात असल्याचे सद्यस्थितीत दिसून येते.
महाड विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची मतदान केंद्रनिहाय आकडेवारी पाहता पोलादपूर तालुक्यातील मतदार आगामी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील निवडणुकीमध्ये कोणाला कौल देतील, याचा सकृतदर्शनी अंदाज वर्तविता येणे शक्य असताना विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतील बंडखोरी, नजिकच्या काळातील महायुती सरकारमधील रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून बेबनाव, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील राजकीय स्थित्यंतर तसेच शिवसेना शिंदे गटातील पोलादपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठीची रस्सीखेच पाहता पोलादपूर तालुक्यातील देवळे व लोहारे जि.प.गट तसेच देवळे जि.प.गटांतर्गत देवळे पं.स.गण व गोवेले पं.स.गण आणि लोहारे जि.प.गटांतर्गत लोहारे पं.स.गण व कोंढवी पं.स.गणातील उमेदवारांची नावे निश्चित ठरल्याखेरिज उमेदवारांच्या भवितव्याचा अंदाज करणे कठीण आहे.
लोहारे पंचायत समिती गणातील सवाद 1-सेना 286 उबाठा 237, सवाद 2-सेना 250 उबाठा 343, कणगुले सेना 417 उबाठा 313, पार्ले सेना 249 उबाठा 160, लोहारे 1-सेना 324 उबाठा 234, लोहारे 2-सेना 272 उबाठा 380, चरई सेना 471 उबाठा 245, तुर्भे बुद्रुक सेना 285 उबाठा 175, तुर्भे खुर्द सेना 352 उबाठा 224, तुर्भे खोंडा सेना 107 उबाठा 108, वझरवाडी सेना 378 उबाठा 211, दिविल सेना 417 उबाठा 313 या 12 मतदान केंद्रांमध्ये शिवसेनेला 3 हजार 808 मतदान झाले आहे तर उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेला 2 हजार 943 मतदान झाले आहे. या लोहारे पंचायत समिती गणात शिवसेनेला 865 मताधिक्य आहे.
कोंढवी पंचायत समिती गणातील काटेतळी सेना 255 उबाठा 98, सडवली सेना 214 उबाठा 171, कोंढवी सेना 213 उबाठा 159, महालगुर सेना 253 उबाठा 145, ओंबळी सेना 344 उबाठा 222, कोतवाल खुर्द सेना 152 उबाठा 188, परसुले सेना 386 उबाठा 74, कोतवाल बुद्रुक सेना 223 उबाठा 312, कुडपण बुद्रुक सेना 303 उबाठा 48, पैठण सेना 85 उबाठा 105, भोगाव खुर्द सेना 443 उबाठा 134, महाळुंगे सेना 250 उबाठा 119, मोरगिरी सेना 228 उबाठा 179, मोरगिरी फौजदारवाडी सेना 197 उबाठा 196, धामणदिवी सेना 55 उबाठा 202, देवपूर सेना 192 उबाठा 145, पळचिल सेना 274 उबाठा 133, गोळेगणी सेना 214 उबाठा 99 या 19 मतदान केंद्रांमध्ये 4 हजार 67 मतदान शिवसेनेला झाले आहे तर 2 हजार 729 मतदान उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेला झाले आहे.
एकूण जिल्हा परिषदेच्या लोहारे गटांतर्गत 31 मतदान केंद्रांमध्ये शिवसेनेला 7 हजार 875 मतदान झाले आहे तर उबाठा सेनेला 5 हजार 672 मतदान झाल्याने शिवसेनेला 2 हजार 203 मतांची आघाडी दर्शवित मतदारांचा कौल उघड झाला आहे.
गोवेले पंचायत समिती गणातील गोवेले सेना 322 उबाठा 205, ढवळे सेना 212 उबाठा 101, उमरठ सेना 445 उबाठा 54, धारवली सेना 191 उबाठा 217, आंग्रेकोंड सेना 226 उबाठा 107, कालवली सेना 244 उबाठा 251, मोरसडे सेना 287 उबाठा 159, सडे सेना 144 उबाठा 20, बोरघर सेना 345 उबाठा 157, कामथे सेना 245 उबाठा 49, वडघर बुद्रुक सेना 233 उबाठा 76, आडावळे बुद्रुक सेना 336 उबाठा 253, बोरावळे 1-सेना 176 उबाठा 136, बोरावळे 2 गुडेकरकोंड-सेना 214 उबाठा 84, रानवडी बुद्रुक सेना 183 उबाठा 152, घागरकोंड सेना 81 उबाठा 67, माटवण सेना 493 उबाठा 357 या 17 मतदान केंद्रांमधील 4 हजार 377 मतदान शिवसेनेला आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेला 2 हजार 445 मतदान झाले. या पंचायत समिती गणात शिवसेनेला 1 हजार 932 मतांची आघाडी दिसून येते.
देवळे पंचायत समिती गणातील देवळे सेना 223 उबाठा 152, करंजे सेना 131 उबाठा 70, दाभिळ सेना 337 उबाठा 147, लहुळसे, केवनाळे सेना 129 उबाठा 69, वाकण 1-सेना 351 उबाठा 169, वाकण 2-सेना 367 उबाठा 144, नाणेघोळ सेना 184 उबाठा 43, कापडे खुर्द सेना 363 उबाठा 172, रानकडसरी सेना 119 उबाठा 38, कापडे बुद्रुक 1-सेना 415 उबाठा 321, कापडे बुद्रुक 2-सेना 365 उबाठा 362, रानबाजिरे, चांभारगणी बुद्रुकसेना 215 उबाठा 292, निवे सेना 197 उबाठा 118, किनेश्वर सेना 316 उबाठा 66, साखर सेना 271 उबाठा 539 या 17 मतदान केंद्रांत 3हजार 983 मतदान शिंदे शिवसेनेसोबत तर उध्दव सेनेसोबत 2 हजार 702 मतदार दिसून येतात. देवळे पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेला 1 हजार 281 मताधिक्य दिसून येत आहे. एकूण जिल्हापरिषदेच्या देवळे गटांतर्गत 34 मतदान केंद्रांमध्ये मतदारांचा कौल सेनेच्या बाजूने असून पोलादपूर तालुक्यातील एकूण 65 मतदान केंद्रांतून सेनेला 18 हजार 223 मतदान झाले असून उबाठा गटाला 12 हजार 380 मतदान झाले असल्याने 5 हजार 850 मताधिक्य सेनेला दिसून येत आहे.
यावरूप पोलादपूर तालुक्यातील आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषदेची निवडणूक एकतर्फी दिसून येत असली तरी चुरशी निर्माण करण्यासाठी राजकीय स्थित्यंतरांची गरज असली तरी या महायुतीअंतर्गत संघर्षामध्ये लाडू म्हणजे विविध पक्षांमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या लाडूसदृश्य नेत्यांच्या पक्षातील निष्ठावंतांच्या बुंद्या निसटू लागल्या तर नेत्यांचे वजन कमी होऊन थोडक्यात पराभूत होण्यासाठी निसटलेल्या बुंद्याच कारणीभूत ठरतात, याकडे दलबदलू नेत्यांचे दूर्लक्ष होत आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.