
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) :
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केंद्रीय सहकार मंत्रालय आणि नाबार्डच्या संयुक्त पुढाकारातून सुरू केलेला विविध कार्यकारी सहकारी संस्था संगणकीकरण प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला आहे. ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी भुवनेश्वर येथे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांच्याद्वारे प्रकल्पाचे सादरीकरण होणार आहे.
देशातील ६२,३१८ सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्याच्या या प्रकल्पात रायगड बँक अव्वल स्थानावर आहे. नाबार्डचे अध्यक्ष के.व्ही. शाजी आणि सहकार विभागाचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
बँकेच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक राज्य सहकार आयुक्त दीपक तावरे आणि नाबार्डच्या महाराष्ट्र प्रमुख रश्मी दराड यांनी केले आहे.