PEN न्यूज ऑनलाइन टीम : रायगड जिल्हा कृषी सेवा असोसिएशनची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी दिनेश म्हात्रे , उपाध्यक्ष पराग वैरागी, सचिव जयवंत वाघ, खजिनदार अमोल पाटील, सल्लागार पत्रकार मितेश जाधव, सहसल्लागार परेश मोकळं, सदस्य रमेश पाटील, अमित शेठ, दर्शन शिळीमकर, महेंद्र माळी, सुहास वणगे, साईनाथ नाईक, आदींची एकमताने निवड करण्यात आली.निवड झालेल्या सर्व सदस्यांचा सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहेत
यावेळी कार्यक्रम प्रसंगी रायगड जिल्हा अध्यक्ष दिनेश म्हात्रे यांनी बोलतांना सांगितले की, कृषी सेवा केंद्राना मार्गदर्शन व संघटना बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची धेय्य धोरण पूर्णत्वास नेण्यासाठी तसेच कृषी सेवा केंद्राच्या अडी अडचणी सोडण्यासाठी व एखाद्या कृषी केंद्र वर अन्याय असेल तर त्याला न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्न करेन असे यावेळी बोलत होते.