रायगड जिल्ह्यात कबड्डीप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरलेली रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा या वर्षी वाशी वढाव येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
७, ८ व ९ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जयभवानी वाशी, वरसुआई वाशी व वैकुंठदादा पाटील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
या स्पर्धेत १९२ पुरुष संघ आणि ३२ महिला संघ सहभागी होणार असून ५० पंचांच्या देखरेखीखाली सामने पार पडणार आहेत. या भव्य आयोजनासाठी एकूण ६ क्रीडांगणांची उभारणी करण्यात आली असून, ५,००० ते १०,००० प्रेक्षकांची क्षमता असलेल्या गॅलरीसह उत्तम व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच व्हीआयपी गेट व वाहन पार्किंगसाठी ३ गेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती आयोजक वैकुंठशेठ पाटील व आस्वाद पाटील (पप्पूशेठ) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी भाजप सरचिटणीस मिलिंद पाटील, शरद कदम, परशुराम म्हात्रे, जगदीश पाटील, सूर्यकांत ठाकूर, निलेश पाटील, पद्माकर पाटील आणि संजय मोकल यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे उद्घाटन आणि समारोप प्रसंगी राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील, लोकसभा खासदार सुनील तटकरे, मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री आदीती तटकरे, मंत्री भरत गोगावले, आमदार प्रशांतदादा ठाकूर, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार जयंतभाई पाटील आणि चित्राताई वाघ यांसह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आयोजक वैकुंठ पाटील यांनी सांगितले.
कबड्डी या मातीतल्या खेळाला प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेसाठी कबड्डीप्रेमींसह स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. उत्कृष्ट खेळाडू निवडण्याबरोबरच या स्पर्धेतून जिल्हा अजिंक्य संघही निश्चित होणार आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.