रायगड जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवैध मटका, जुगार आणि वेश्या व्यवसायावर मोठी कारवाई केल्याचा दावा केला होता. मात्र, ही कारवाई केवळ काही दिवस टिकून राहिली. आता पुन्हा एकदा मटका अड्डे, पत्ता क्लब, डिझेल विक्री, वेश्या व्यवसाय उघडपणे सुरू झाले असून पोलीस यंत्रणा याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याची टीका नागरिकांतून होत आहे.
जिल्ह्यात सुमारे 2000 हून अधिक मटका अड्डे सुरू असून ऑनलाईन मटका जोरात सुरू आहे. गरीबांपासून ते शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकजण या धंद्यात गुंतले आहेत. अनेक बार पहाटेपर्यंत सुरू असून त्यातूनही पोलिसांना मोठा ‘मालिदा’ मिळत असल्याचे आरोप आहेत.
मटका व्यवसायाच्या जोमात सुरू असण्यामागे राजकीय आणि पोलिस यंत्रणेचा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. पोलिस अधीक्षक आणि एलसीबी प्रमुखांशी संपर्काचा प्रयत्न केला असता, ते मिटिंगमध्ये असल्याचे सांगण्यात आले.
सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर बेतणाऱ्या या अवैध धंद्यांवर तात्काळ आणि प्रभावी कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.