रायगडमध्ये पुढील ३ ते ४ तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा – खबरदारी घेण्याचं आवाहन

Paaus
महाड (मिलिंद माने ) : 
भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी ०४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी 03:४५ वाजता जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, रायगड जिल्ह्यातील काही भागांत पुढील ३ ते ४ तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह (३०-४० किमी/ताशी) हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला असून, वादळी वाऱ्यांपासून व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे व हवामान विभागाच्या अधिकृत सूचना लक्षपूर्वक पाहाव्यात.

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading