रायगडमध्ये तणावाचं वातावरण ! पालकमंत्रीपद न मिळाल्यानं गोगावले समर्थक बोंबाबोंब आंदोलन करत रस्त्यावर, महामार्ग दोन तास रोखला

Mahad Rasta Roko
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांनी बाजी मारत पालकमंत्रीपदाची माळ आपल्या गळ्यात घातली. यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे समर्थक आक्रमक झाले असून, रायगडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्यात चुरस होती. अखेर अदिती तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मात्र, या निर्णयामुळे गोगावले समर्थकांनी संताप व्यक्त करत आंदोलने केली. महाडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला. समर्थकांनी गोगावले यांचा जयजयकार करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
शिवसेना कार्यकर्त्यांनी दोन तास महामार्ग रोखून ठेवला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली, परंतु परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
भरत गोगावले यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत “हा निर्णय अनपेक्षित असून मनाला न पटणारा आहे, तरीही आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचा आदर करू,” असे सांगितले.
रायगडमधील पालकमंत्रीपदाचा संघर्ष थांबला असला तरी या घटनेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील तणाव उफाळून आला आहे.
पालकमंत्र्यांची यादी
गडचिरोली       देवेंद्र फडणवीस
ठाणे एकनाथ शिंदे
मुंबई शहर एकनाथ शिंदे
पुणे अजित पवार
बीड अजित पवार
नागपूर चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम हसन मुश्रीफ
सांगली चंद्रकांत पाटील
नाशिक गिरीश महाजन
पालघर गणेश नाईक
जळगाव गुलाबराव पाटील
यवतमाळ संजय राठोड
मुंबई उपनगर आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा
रत्नागिरी उदय सामंत
धुळे जयकुमार रावल
जालना पंकजा मुंडे
नांदेड अतूल सावे
चंद्रपूर अशोक उईके
सातारा शंभूराज देसाई
रायगड आदिती तटकरे
लातूर शिवेंद्रसिंहराजे भोसले
नंदूरबार माणिकराव कोकाटे
सोलापूर जयकुमार गोरे
हिंगोली नरहरी झिरवाळ
भंडारा संजय सावकारे
छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट
धाराशिव प्रताप सरनाईक
बुलडाणा मकरंद जाधव (पाटील)
सिंधुदुर्ग नितेश राणे
अकोला आकाश फुंडकर
गोंदिया बाबासाहेब पाटील
कोल्हापूर प्रकाश आबिटकर
कोल्हापूर माधुरी मिसाळ (सह-पालकमंत्री)
गडचिरोली आशिष जयस्वाल (सह -पालकमंत्री)
वर्धा पंकज भोयर
परभणी मेघना बोर्डीकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading