रायगडकरांची परवड थांबली, पासपोर्ट सेवा केंद्र जिल्ह्यात कार्यान्वित

passport
रायगड : आता जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढायचा असल्यास, ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठाणे कार्यालयात जावे लागत असे. मात्र भारतीय डाक विभाग व परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या समन्वयाने डाकघर अलिबाग येथे पासपोर्ट सेवा उपलब्ध झाली आहें. या पासपोर्ट सेवा केंद्राचा शुभारंभ खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला.
यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोस्ट विभगातील अधिकारी किशन शर्मा, अॅड. प्रविण ठाकूर, अमित नाईक उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील असंख्य नागरिक, विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसाय व शिक्षणासाठी परदेशवारीला जाण्याची संधी मिळते. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट महत्त्वाचे आहे. मात्र, हे पासपोर्ट काढण्यासाठी रायगडकारांना ठाणे रिजनल पासपोर्ट कार्यालयात जावे लागते. यामुळे रायगड जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत शासनाने अलिबाग शहरातील जिल्हा डाकघर कार्यालयाच्या इमारतलगत पासपोर्ट कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. आत्ता रायगडकरांना पासपोर्टसाठी इतरत्र कोठे जावे लागणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading