रामदास पठार येथील पर्यटन विकासासाठी प्रेरणा रामदास स्वामी आणि अरविंदनाथ महाराजांकडून : मंत्री ना.भरतशेठ गोगावले यांची स्पष्टोक्ती

Bharta Gogavale Ramdas Pathar
पोलादपूर (शैलेश पालकर) :
समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य असलेल्या रामदास पठारावरील पर्यटन विकासासाठी गेल्या अनेक वर्षापासून समर्थ रामदास स्वामी आणि सद्गुरु अरविंदनाथ महाराज यांच्यापासून प्रेरणा मिळत आली असून रामदास पठारावर शासकीय विश्रामगृहासह सर्व सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी स्पष्टोक्ती मंत्री ना.भरतशेठ गोगावले यांनी जाहिररित्या व्यक्त केली.
श्रीक्षेत्र रामदास पठार येथे श्रीरामदास नवमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड श्रीमददासबोध पारायणानंतरच्या काल्याच्या किर्तन समारोप सोहळयाप्रसंगी ना. गोगावले बोलत होते. यावेळी ना. गोगावले यांनी काल्याची हंडी फोडली. यानंतर ना. भरतशेठ गोगावले यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीरामदास स्वामी यांच्या शिवसमर्थ भेटीच्या पुतळयाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी सद्गुरू श्रीअरविंदनाथ महाराज, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर तसेच श्रीगणेशनाथ महाराज संस्थानाचे पदाधिकारी उपस्थित होते.
ना. गोगावले यांनी, सर्वसामान्य जनता आणि सद्गुरू आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच समर्थांचे आशीर्वाद यामुळेच आज चौथ्यांदा आमदार आणि मंत्रीदेखील झालो आहे. ज्याप्रमाणे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठचा पर्यटन विकास करण्यासाठी कोटयवधींचा निधी उपलब्ध करून घेतला. श्रीक्षेत्र रामदास पठार येथे त्यापेक्षा अधिक निधी उपलब्ध करून देणे ही सद्गुरू अरविंदनाथ महाराजांचा शिष्य म्हणून नैतिक जबाबदारी मानतो, असे नम्रपणे सांगितले.
या ठिकाणी पारमाची ते रामदास पठार आणि वरंध कुंभार कोंड ते रामदास पठार असे दोन्ही बाजूंनी रस्ते करुन विकास कामे करणार असून याबदल्यात आम्ही फक्त पाच वर्षांनी आशीर्वाद मागतोय आणि जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीला मतदानाची अपेक्षा करतोय. सेवेची संधी दिली तर कामे मार्गी लागतील यात शंका बाळगण्याचे कारण नाही, असा संवाद ना. गोगावले यांनी उपस्थित समर्थ भक्तांसोबत साधला. यावेळी ना. गोगावले यांनी विरोधकांनी एका नव्या पैशाची कामे न करता त्यांना इथून मतदान तरी कसे झाले, असा सवाल करीत नाराजी व्यक्त केली.
यावेळी नारायण डिगे यांनी प्रास्ताविकात रामदास पठारचा कायापालट करण्यासाठीच ना. भरत गोगावले यांना चौथ्यांदा मंत्रीपदासह संधी मिळाली असून त्यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पददेखील मिळावे, अशी समर्थ रामदास स्वामींच्या चरणी प्रार्थना करीत असल्याचे सांगितले.
शेवटी श्री गणेशनाथ महाराज संस्थानाचे सद्गुरू श्रीनिवासी अरविंदनाथ महाराज यांनी, ना. गोगावले हे शिष्य आहेत. ते संस्थानाचा भाग आहेत. त्यांच्या सत्तेद्वारे त्यांनी सर्वसामान्यांशी आपला माणूस म्हणून नातं प्रस्थापित केले आहे. त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक देखील आपल्यासोबत नेते खुप झाले त्यांच्या गाडया अलिशान आहेत पण फक्त भरतशेठ गोगावले यांचीच गाडी आपणासमोर थांबते आणि गाडीच्या काचा खाली करून भरतशेठ आस्थापूर्वक चौकशी करतात, अशी भावना व्यक्त करतात. यामुळेच समर्थ रामदास स्वामी ना. गोगावले यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, असा नवस आपण समर्थचरणी करीत आहोत, असे भावनिक उदगार व्यक्त केले.
श्री रामदासनवमी निमित्त शनिवारी श्रीमद दासबोध पारायण झाल्यानंतर रविवारी सकाळी कदम महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले. हजारो रामदासपठारवासीय आणि समर्थ भक्त या समारोपप्रसंगी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading