कर्जत तालुक्यातील खांडस, पाथरज, नांदगाव या आदी आदिवासी जंगल भागातून पूर्वी पासून मोठया प्रमाणात लाल मातीची तस्करी करून, व्हायवाट ट्रक मधून मंबई सारख्या ठिकाणी नेली जात असल्याचे चित्र होते. या संदर्भात मात्र महसूल विभागातील जबाबदार असलेले अधिकारी वर्गा कडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसून येत नव्हती, मात्र रात्रीचे अंधारात तालुक्यामधून राज रोसपणे ही अवैध लाल मातीची तस्करी सुरू असताना, कर्जत तालुक्यातील काही महिन्यापूर्वी नव्याने तहसीलदार पदाचा कार्यभार हाती घेतलेले डॉ. धनंजय जाधव यांनी मध्यरात्रीच्या सुमारास लाल माती तस्करांवर धडाकेबाज कार्यवाही करत, कर्जत तालुक्यातून होणारे लाल मातीचे तस्करीचे रॅकेट स्पष्ट केले आहे.
कर्जत तालुक्याचे नव्याने तहसीलदार कार्यालयाचा पदभार स्विकारलेले तहसीदार डॉ.धनजय जाधव यांना रात्री साडेअकरा ते चार या वेळेत खांडस, पाथरज, नांदगाव, कशेळे आदी आदिवासी व जंगल भागातून लाल मातीची मोठया प्रमाणात तस्करी करून, व्हायवाट ट्रक मधून मंबई कडे नेली जात असल्याची माहिती खात्री लायक सुत्र व सुज्ञ पत्रकार यांच्या स्तरावरून मिळताच, त्यांनी त्यांचे मंडळ अधिकारी व तलाठी यांचे पथकासह स्वत: तहसीलदार डॉ.धनजय जाधव यांनी संपूर्ण कर्जत तालुका हा सोमवार चे मध्य रात्रीचे सुमारास साखर झोपेत असताना, रात्रीचे ११.०० ते पहाटे ४.०० वाजण्याचे सुमारास खांडस, पाथरज, नांदगाव, कशेळे आदी आदिवासी व जंगल भागात रेखी केली असता, त्यांना व त्यांच्या पथकाला नांदगाव खंडस आणि ओलमण भागात लाल मातीने भरलेले तीन व्हायवाट ट्रक तर सहा रिकामे हायवा ट्रक सापडून आले आहे. या वेळी सहा रिकामे हायवा ट्रक मधील टायर मधील हवा काढून तर भरलेले तीन हायवा ट्रक क्र. एम एच ४६ एफ ४४५३ , एम एच ४६ ए आर ६५९०, एम एच ४६ बी एफ ९६९९ ४४५३ हे कर्जत पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
कर्जत तालुक्यातील जंगल भागातून गेली वर्षभर सुरू असलेले लाल मातीची तस्करी करणाऱ्या पॅकेटचा पर्दा फाश करण्याची महत्त्वाची भूमिका बजावत कर्जत तालुक्यातील निसर्ग संपदा लाभलेल्या वनराई जंगल आणि लाल मातीवर मुंबई मधील काही धनीक व बांधकाम व्यावसायीकांचा असलेला डोळा त्यानुसार कर्जत तालुक्यातील लाल माती रात्रीच्या अंधारात तस्करी करून अवैधरित्या मुंबईकडे रवाना रोख लावण्यासाठी कर्जत तहसीलदार यांनी उचललेले एक पाऊल व केलेली कार्यवाही मुळे अशा राज रोसपणे अवैधरित्या लाल माती तस्करी करण्यावर मात्र जरब बसविण्याचे म्हत्वपूर्ण काम केले असल्याने, कर्जतचे तहसीलदार डॉ.धनजय जाधव व त्यांचे पथकाच्या उत्तम कामगिरीचे सामान्य जननेतून कौतूक केले जात आहे.
—————————————–
खांडस, पाथरज, नांदगाव, कशेळे आदी आदिवासी व जंगल भागातून लाल मातीची मोठया प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती मझ्या कडे प्राप्त झाल्याने, मी स्वत: व महसुल विभागातील मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांच्या माध्यमातून सोमवारचे रात्री ११.०० ते पहाटे ४.०० वाजण्याचे सुमारास खांडस, पाथरज, नांदगाव, कशेळे आदी आदिवासी व जंगल भागात फिरून रेखी केली असता, नांदगाव खंडस आणि ओलमण भागात लाल मातीने भरलेले तीन हायवा ट्रक व सहा रिकामी हायवा ट्रकची हवा काढून विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.
…डॉ. धनजय जाधव, कर्जत तहसीलदार.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.