गेले कित्येक दिवसापासून प्रतीक्षेत असलेले राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचे खाते वाटप पुढीलप्रमाणे;
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, ऊर्जा (अपारंपारिक ऊर्जा वगळून) विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम)
उपमुख्यमंत्री अजित पवार : वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क.
महाराष्ट्राचे नवे मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे : महसूल
राधाकृष्ण विखे – पाटील : जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)
हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण
चंद्रकांत (दादा) पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य
गिरीश महाजन : जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन.
गणेश नाईक : वने
गुलाबराव पाटील: पाणी पुरवठा व स्वच्छता.
दादाजी भुसे: शालेय शिक्षण.
संजय राठोड : मृद व जलसंधारण.
धनंजय मुंडे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.
मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता.
उदय सामंत : उद्योग, मराठी भाषा
जयकुमार रावल : पणन, राजशिष्टाचार.
पंकजा मुंडे : पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन.
अतुल सावे : इतर मागास, बहूजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा
अशोक उईके : आदिवासी विकास.
शंभुराज देसाई : पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण.
आशिष शेलार : माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य.
दत्तात्रय भरणे : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.
आदिती तटकरे : महिला व बालविकास.
शिवेंद्रसिंह भोसले : सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून).