
कुणाचा विलासराव देशमुख होणार तर कोणाचा हर्षवर्धन पाटील होणार
मुंबई ( मिलिंद माने ) :
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा सन २०२४ च्या विधानसभा निवडणुका या अटीतटीच्या होणारा असून राज्यातील २८८ मतदार संघापैकी ७० विधानसभा मतदार संघामधील निवडणुका या निर्णायक ठरणार असून यातील विजय व पराभवामुळे कुणाचा विलासराव देशमुख होणार? तर कोणाचा हर्षवर्धन पाटील होणार? अशी चर्चा या ७० विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा कानोसा घेतला असता मतदारांकडून याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असल्याचे पाहण्यास मिळाले
राज्यातील २०२४ ची विधानसभा निवडणुकी मागील अनेक वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीपेक्षा मोठी निर्णायक ठरणार असून या विधानसभा निवडणुकीत ज्याचा विजय होईल तो पुढील १५ वर्षे राजकारणात तग धरून राहील तर ज्याचा पराजय होईल तो राजकारणातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या दोन दिगज्य व अभ्यासू नेते जशी महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर फेकल्या गेले तीच अवस्था राज्यातील किमान ७० विधानसभा मतदारसंघातील दिग्गज नेत्यांची होणार असल्याची चर्चा या मतदारांचा कानोसा घेतला असता ऐकण्यास मिळाली.
राज्यातील मागील काळात बदललेल राजकारण, त्यानंतर बदललेली समाज व्यवस्था, मोठ्या प्रमाणावर झालेले राजकीय ध्रुवीकरण, त्याचबरोबर समाजा- समाजात झालेली तेढ ,ठराविक लोकप्रतिनिधींकडे व उद्योग व्यवसायिकांकडे अवैध धंद्यातून गडगंज. प्राप्त झालेली संपत्ती ,सत्ता व राजकारणातली हुकूमशाही, अमर्याद सत्तेचा वापर या सर्वच कारणांमुळे राज्यातील समाज व्यवस्था पूर्णपणे बदलून गेली आहे त्याचाच परिणाम राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघ व ४८ लोकसभा मतदारसंघातील जनतेवर झाला आहे. याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात पाहण्यास मिळाला त्याचीच प्रचिती २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत किमान ७० मतदार संघात पाहण्यास मिळणार आहे.
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी ७० विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या अटीतटीच्या लढती त्याची माहिती पुढीलप्रमाणे;
१) विजयकुमार गावित ३ नंदुरबार
२) गुलाबराव पाटील १४ जळगाव ग्रामीण
३) गिरीश महाजन १९ जामनेर
४) श्वेता महाले २३ चिखली
५) रवी राणा ३७ बडनेरा
६) ओम प्रकाश बच्चू कडू ४२ अचलपूर
७) अनिल देशमुख ४८ काटोल
८) देवेंद्र गंगाधर फडणवीस ५२दक्षिण पश्चिम नागपूर
९) नाना पटोले ६२ साकोली
१०) धर्मराव बाबा आत्राम ६९ अहेरी
११) संतोष रावसाहेब दानवे १०३भोकरदन
१२) अब्दुल सत्तार १०४ सिल्लोड
१३) दादा भुसे ११५ भाह्य मालेगाव
१४) छगन भुजबळ ११९ येवला
१५) गणपत गायकवाड १४२कल्याण पूर्व
१६) रवींद्र चव्हाण १४३ डोंबिवली
१७) गीता जैन १४५ मीरा-. भाईंदर
१८) प्रताप सरनाईक १४६ ओवळा माजिवडा
१९) एकनाथ संभाजी शिंदे १४७ कोपरी पाचपाखाडी
२०) जितेंद्र आव्हाड १४९ मुंब्रा -कळवा
२१) गणेश नाईक १५० ऐरोली
२२) प्रकाश सुर्वे १५४ माग ठाणे
२३) राम कदम १६९ घाटकोपर पश्चिम
२४) पराग शहा १७० घाटकोपर पूर्व
२५) जीशान बाबा सिद्दिकी १७६वांद्रे पूर्व
२६) कालिदास कोळमकर १८० वडाळा
२७) सदानंद सरवणकर १८१ माहीम
२८) आदित्य उद्धव ठाकरे १८२वरळी
२९) यामिनी जाधव १८४ भायखळा
३०) मंगल प्रभात लोढा १८५मलबार हिल
३१) एडवोकेट राहुल नार्वेकर १८७कुलाबा
३२) प्रशांत रामशेठ ठाकूर १८८पनवेल
३३) महेंद्र थोरवे १८९ कर्जत
३४) महेंद्र दळवी १९२ अलिबाग
३५) आदिती सुनील तटकरे १९३श्रीवर्धन
३६) भरत मारुती गोगावले १९४ महाड
३७) दिलीप वळसे पाटील १९६आंबेगाव
३८) एडवोकेट राहुल कुल १९९ दौंड
३९) दत्तात्रय भरणे २०० इंदापूर
४०) अजित अनंत पवार २०१बारामती
४१) सुनील टिंगरे २०८ वडगाव शेरी
४२) चंद्रकांत बच्चू पाटील २१० कोथरूड
४३) विजय उर्फ बाळासाहेब थोरात २१७ संगमनेर
४४) राधाकृष्ण विखे पाटील २१८ शिर्डी
४५) बबनराव पाचपुते २२६ श्रीगोंदा
४६) रोहित पवार २२७ कर्जत जामखेड
४७) प्रकाश सोळंके २२९ माजलगाव
४८) संदीप क्षीरसागर २३० बीड
४९) धनंजय पंडितांना मुंडे २३३ परळी
५०) राणा जगजीत सिंग पाटील २४१ तुळजापूर
५१) तानाजी सावंत २४३ परांडा
५२) विजय देशमुख २४८ सोलापूर शहर उत्तर
५३) सुभाष देशमुख २५१ सोलापूर दक्षिण
५४) समाधान आवताडे २५२ पंढरपूर
५५) एडवोकेट शहाजी बापू पाटील २५३ सांगोला
५६) मकरंद जाधव २५६ वाई
५७) पृथ्वीराज चव्हाण २६०कराड दक्षिण
५८) शंभूराज देसाई २६१ पाटण
५९) शिवेंद्रसिंह अभयसिंह राजे भोसले २६२ सातारा
६०) योगेश रामदास कदम २६३ दापोली
६१) भास्कर जाधव २६४ गुहागर
६२) उदय सामंत २६६ रत्नागिरी
६३) राजन साळवी २६७ राजापूर
६४) नितेश नारायण राणे २६८ कणकवली
६५) वैभव नाईक २६९ कुडाळ
६६) दीपक केसरकर २७० सावंतवाडी
६७) हसन मिया लाल मुश्रीफ २७३कागल
६८) डॉक्टर विनायक कोरे २७७ शाहूवाडी
६९) जयंत राजाराम बापू पाटील २८३इस्लामपूर
७०) विश्वजीत पतंगराव कदम २८५ पलूस कडेगाव