महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असून, ओबीसी आरक्षणासंबंधित सुनावणी २२ जानेवारीऐवजी २८ जानेवारीपर्यंत लांबली आहे. न्यायालयीन निर्णय आणि प्रभाग पुनर्रचनेमुळे निवडणुका एप्रिल-मे मध्ये होणे शक्य नाही. पाणीटंचाई, उष्णता, व पावसाळा यामुळे निवडणुका थेट ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या काळातील तीन सदस्यीय प्रभाग रचना बदलून महायुती सरकारने चार सदस्यीय प्रभाग रचना केली. मात्र न्यायालयीन प्रक्रिया व नव्या हरकतींमुळे प्रभाग पुनर्रचनेसाठी किमान ९० दिवस लागणार आहेत. प्रशासकांच्या मनमानी कारभारामुळे सामान्य नागरिक व स्थानिक पदाधिकारी त्रस्त झाले आहेत.
निवडणुकींच्या विलंबामुळे इच्छुक उमेदवार निराश असून, राजकीय पक्ष निवडणुकांसाठी ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. प्राथमिक अंदाजानुसार महानगरपालिका निवडणुका प्रथम होऊन अन्य निवडणुका त्यानंतर होतील. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मात्र २०२५ उजाडण्याची शक्यता आहे.
राज्यातील निवडणुका प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आकडेवारी ……………………. महानगरपालिका २३ जिल्हा परिषदा २६ पंचायत समित्या २८४ नगरपालिका २०७ नगरपरिषदा ९२ नगरपंचायती १३ ………….एकूण ६४४
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.