राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यांच्याच जिल्ह्यात 264 लाडक्या बहिणी व त्यांच्या मुलींवर अत्याचार; धक्कादायक वास्तव समोर

Rape1
रायगड ( अमुलकुमार जैन ) : 
एकीकडे सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेचे ढोल पिटत असताना रायगड जिल्ह्यात मात्र या लाडक्या बहिणी असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महीला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या जिल्ह्यात 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 द या बारा महिन्यांत तब्बल 264 महिलांवर अत्याचार झाल्याची आकडेवारी खुद्द रायगड पोलिस विभागाने नुकतीच जाहीर केली आहे. त्यात सर्वाधिक 157 घटना या विनयभंगाच्या असून 107 घटनांमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे.
महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही दुय्यमच आहे. त्या घरात आणि बाहेरही सुरक्षित नसल्याचे गेल्या वर्षीच्या महिला संदर्भातील गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून दिसत आहे.
रायगड जिल्ह्यात महिला महिला सुरक्षीत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जिल्ह्यात बलात्कार व विनयभंगाचे गुन्हे वाढले असून, दर आठवड्याला सरासरी तीन ते पाच महिला या गुन्ह्यांना बळी पडत आहेत. या गुन्ह्यांची उकल करुन आरोपींना गजाआड करण्यात यश आल्याचे पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले असून, 98टक्के गून्हांची उकल करण्यात आली आहे.
समाज आधुनिक होत आहे, तितकेच महिलांवरील अत्याचारही वाढत असल्याचे या घटनांवरून दिसत आहे. हे वाढते अत्याचार समाजासाठी चिंतेची बाब ठरत आहे. महिलांवर शारीरिक, मानसिक आणि भावनिक अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार, विनयभंग, हुंडाबळी, सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या, या घटना सातत्याने घडत आहे. दुर्दैवाने मोठ्या शहरात घटना घडली तर त्या विरोधात आवाज उठवला जातो, अंतर ग्रामीण भागात अशा घटना अनेकदा पोलीस ठाण्यांपर्यंतही पोहोचत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात जवळचे नातेवाईक, परिचायतील व्यक्तीचा सहभाग अधिक आढळून आला आहे. अल्पवयीन मुलींच्या बाबतीतही हाच प्रकार घडत आहे.
महिला सुरक्षिततेसाठी दामिनी पथक
रायगड जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाने महिला पोलिसांच्या दामिनी पथकाची निर्मिती केली आहे. त्यांना मोटारसायकल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच या पथकाला विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, समुद्रकिनारे आणि गर्दीच्या ठिकाणी या पथकाची नियमित गस्त सुरू असते. या पथकांचे नंबर शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांना उपलब्ध करून दिले असून या नंबरवर संपर्क साधल्यास अवघ्या काही मिनिटांत दामिनी पथक घटनास्थळी दाखल होऊ शकेल अशी व्यवस्था आहे. मात्र एवढे प्रयत्न करूनही महिलांसंबंधी गुन्हे कमी झाले नसल्याचे चित्र दाखल गुन्ह्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading