राज्यस्तरीय पिनच्याक सिलाट स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंची लक्षवेधी कामगिरी

Pinchyak Salad Raigad Sportman
नागोठणे ( महेंद्र माने )  :
कोपरखैरणे येथील क्रिस्ट अकॅडमी मध्ये झालेल्या 14 व्या राज्यस्तरीय पिनच्याक सिलाट स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी बाजी मारली असून 3 सुवर्णपदक,11 रौप्यपदक, 7 कांस्यपदकाचे मानकरी ठरले आहेत.
या स्पर्धेत 7 ते 9 वर्ष वयोगटात श्रियश सचिन शेडगे – 2 रौप्यपदक,जय शेखर गोळे – 2 रौप्यपदक, रितिका दशरथ भोईर व रीयांशी सूर्यप्रकाश सिंह प्रत्येकी एक एक कांस्यपदक,10 ते 11 वर्ष वयोगटात शर्वी दीपक सुटे – 2 रौप्यपदक, 12 ते 13 वर्ष वयोगटात पीयूष दीपक साळुंखे रौप्यपदक,14 ते 16 वर्ष वयोगट अथर्व केतन पिंगळे – सुवर्णपदक, अनिश किरण पालकर –रौप्यपदक,विघ्नेश कैलास घासे – कांस्यपदक, नेहा हिरामण दोरे – एक सुवर्णपदक तर एक कांस्यपदक, रुचल चंचल जाना – दोन रौप्यपदक, वैष्णवी कैलास घासे – कांस्यपदक, 17 ते 45 वर्ष वयोगटात रोहित परशुराम गायकवाड – एक सुवर्ण व एक रौप्यपदक, प्रशांत प्रकाश सारगे- रौप्यपदक तसेच अक्षय अशोक मांडवकर यांनी दोन कांस्यपदक मिळवून रायगड जिल्ह्यात मानाचे स्थान मिळविले. सर्व विजेत्या खेळाडुंचे विभागासह जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading