राजकारणापासून अलिप्त असलो तरी काँग्रेस पक्षातच राहणार : मुश्ताक अंतुले यांची ग्वाही

Mahendra Gharat & Mustak Antule
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री पद दोनवेळा भुषविणारे मरहूम बॅ.ए.आर.अंतुले यांचे पुतणे तथा जावई मुश्ताक अंतुले यांची रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी ‘अलसबाह कोर्ट’ बंगल्यावर भेट घेतली असता मुश्ताक अंतुले यांनी गेल्या काही दु:खद घटनांमुळे कौटूंबिक आधार देण्यास प्राधान्य दिल्यामुळे आपण अनेक वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त आहोत. मात्र, काँग्रेस पक्षाच्या या महत्वाच्या काळामध्ये आपण काँग्रेस पक्षामध्येच राहणार आहोत, असे सांगितले आहे.
रायगड जिल्ह्यातील एका अनियमित प्रसिध्द होणाऱ्या वृत्तपत्रामध्ये मुश्ताक अंतुले लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात म्हणजेच महायुती सरकारच्या घटकपक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी प्रसिध्द झाली. मात्र, तत्पुर्वीच  काही सुत्रांच्या हवाल्यावरून हवेवरच्या बातम्यांद्वारे मुश्ताक अंतुले यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या अफवा उठल्या होत्या. या पार्श्वभूमीवर लंडनमध्ये काही ट्रेडयुनियनचे करार करण्यासाठी निघालेले रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी मुश्ताक अंतुले यांची भेट घेतली. यावेळी अनेक विषयांवरील अनौपचारिक चर्चेदरम्यान मुश्ताकभाईंनी बॅ.अंतुले यांच्या पत्नी नर्गिसबानू अंतुले यांचे अलिकडेच निधन झाल्याचे व त्याआधी मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी बॅ.अंतुले यांचे पुत्र नाविदभाई यांचे निधन झाले, या पार्श्वभुमीवर कौटुंबिक आधार देणे हे प्रथम कर्तव्य पार पाडत असल्याचे रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांना सांगितले.
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेमध्ये दोनवेळा मुश्ताक अंतुले यांनी सदस्यत्व भुषविले असून प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीचे सरचिटणीसपदही पूर्ण सहयोगाने भुषविले असल्याने बॅ.अंतुले यांचे उत्तराधिकारी म्हणून मुश्ताकभाईंना बॅ.अंतुले यांच्या हयातीतच जनमान्यता मिळाली होती. पुनर्रचित रायगड लोकसभा मतदार संघाची पहिली निवडणूक लढविल्यानंतर काही महिन्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे बॅ.अंतुले यांना दीर्घकाळ उपचार घ्यावे लागले होते. या उपचारांनंतर बॅ.अंतुले यांचे निधन झाल्यामुळे मुश्ताकभाईंवर कुटूंबियांना मानसिक आधार देण्यासाठी कुटूंबप्रमुख म्हणून जबाबदारी घ्यावी लागली. याच काळामध्ये पुनर्रचित रायगड लोकसभा मतदार संघात बॅ.अंतुले यांचा पराभव करणाऱ्या अनंत गीते यांच्या नेतृत्वाखाली बॅ. अंतुले यांचा पुत्र नाविद याने शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. बॅ.अंतुले यांच्या पराभवानंतर गीते यांच्याबद्दल बॅ.अंतुले यांनी संसदेमध्ये चारवेळा निवडून आलेल्या गीतेंकडून पराभव झाल्याने योग्य तुल्यबळ व्यक्तीकडून पराभव झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले होते, अशी माहिती यावेळी मुश्ताक अंतुले यांनी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांना दिली.
देशात आणि राज्यामध्ये काँग्रेस तसेच अन्य पक्षांबाबतचे सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांचे धोरण आणि काँग्रेसचे युवा नेतृत्व राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेबाबत यावेळी मुश्ताक अंतुले यांनी अभिमानही व्यक्त केला. आपण वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे काँग्रेस पक्ष तसेच राजकारणातील सक्रीयतेपासून अलिप्त असल्याचे यावेळी सांगताना रायगडचे सहकारी माणिकराव जगताप, मधुकर ठाकूर, आर.सी.घरत, रवींद्र राऊत यांच्या निधनानंतर रायगड काँग्रेसमध्ये तत्कालीन नेतृत्वाचा अभाव दिसून येत असून रामशेठ ठाकूर व रवींद्र पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अजूनही अडीच तीन लाख मतदार असलेल्या रायगड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसला योग्य उमेदवार व प्रभावी नेतृत्व नसल्याने महेंद्र घरत यांच्याकडून होत असलेल्या पक्षबांधणीच्या कामाची यावेळी मुश्ताक अंतुले यांनी प्रशंसाही केली. सध्याचा काळ काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई असली तरी लवकरच काँग्रेसच्या मतदारांना आशादायी भुमिका घेत आपण सक्रीय होऊ, असा विश्वासही यावेळी मुश्ताक अंतुले यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading