पनवेल :
महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे येथे रस्ता सुरक्षा अभियान- 2025 च्या अनुषंगाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस, रायगड परिक्षेत्र, तानाजी चिखले, रासम, पोलीस उप अधीक्षक, रायगड परिक्षेत्र श्रीमती ज्योत्स्ना व पोलीस निरीक्षक, पनवेल विभाग भरत शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभारी अधिकारी, महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे, वैभव रोंगे यांचे नेतृत्वाखाली महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, नवी मुंबई येथे रोटरी क्लब ाफ पनवेल सिटी यांचे सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरामध्ये महामार्ग सुरक्षा पोलीस पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार, आय आर बी स्टाफ, देवदूत स्टाफ व इतर नागरिक असे एकुण 42 रक्तदाता यांनी स्वईच्छेने रक्तदान केले.