रविशेठ पाटील यांच्या विजयाचा नागोठणे शहरात जल्लोष

Nagotahne Bjp
नागोठणे ( महेंद्र माने ) :
विधानसभा पंचवार्षिक निवडणूकित 191 पेण सुधागड रोहा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी साधारण 60 हजार 810 मताने विजय मिळविला. या विजयाचा जल्लोष महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नागोठणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीचे नेते शिवराम शिंदे,विलास चौलकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांभेकर व श्रेया कुंटे,ता.सरचिटणीस एकनाथ ठाकूर व आनंद लाड,मा.जि.अध्यक्ष किशोर म्हात्रे,शहर अध्यक्ष सचिन मोदी, जिल्हा उत्तर भारतीय सेल अध्यक्ष राजन दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाक्यांची आतषबाजी करून एकमेकांना व चौकात लाडू वाटून साजरा केला.
सदरील विजयी मिरवणूक छ.शिवाजी महाराज बाजारपेठ,खुमाचा नाका,गांधी चौक मार्गे ग्रामदैवत जोगेश्वरी मातेच्या मंदिरात येऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी महिला मोर्चा ता. अध्यक्षा अपर्णा सुटे,शेखर गोळे, अशोक अहिरे,धनराज उमाळे,संतोष चितळकर,ज्ञानेश्वर शिर्के,शीतल नांगरे,मुग्धा गडकरी,रऊफ कडवेकर, फातिमा सय्यद, संतोष घाग,संतोष कावेडिया,प्रमोद गोळे,विठोबा माळी, विवेक रावकर,तिरत पोलसानी, सखाराम ताडकर,प्रथमेश काळे,गणेश जाधव,गौतम जैन,अंकुश सुटे, मोरेश्वर म्हात्रे आदिंसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading