युवा नेते प्रसाद भोईर ‘सर्वात आशादायी राजकीय नेतृत्व’ महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित

prasad-bhoir
नागोठणे ( महेंद्र माने ) : इंडिया न्यूज व जय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा महाराष्ट्र भुषण पुरस्कारातील ‘सर्वात आशादायी राजकीय नेतृत्व’ हा पुरस्कार भाजपा पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख युवा नेते प्रसाद भोईर यांना रविवार 06 ऑगस्ट रोजी नाशिक येथे प्रसिद्ध मराठी सिने-अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
नाशिक येथील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे झालेल्या या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कामगिरी बद्दल देण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारात प्रसाद भोईर यांना कमी कालावधीत राजकीय क्षेत्रात केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल त्यांच्या राजकीय कार्याचा व लोकप्रियतेचा आढावा घेऊन त्यांना ‘The most promising political personality of the year'( सर्वात आशादायी राजकीय नेतृत्व )या कॅटेगरीतील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
सदर पुरस्कार स्विकारताना प्रसाद भोईर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले, राजकारण हे आपल्यासाठी एक समाजसेवेचे मिशन असून ते आपल्या आत्मसमाधानाचे माध्यम आहे, म्हणूनच राजकारणात कोणत्याही अपेक्षा न ठेवता मी झपाटून काम करत असून वाढत्या कॉर्पोरेट व्यवसायाचा ताण आणि त्या बरोबरच राजकारणात लोकांसाठी द्यावा लागणारा वेळ यामध्ये योग्य संतुलन ठेवत जनतेच्या मनामध्ये आशादायक नेतृत्व म्हणून स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरत असल्याचे मोठी समाधानाची बाब आहे. निस्वार्थी काम करत असताना मला महाराष्ट्र भूषण सारख्या एवढ्या मोठया पुरस्काराने सन्मानित करून पाठीवर कौतुकाची थाप मिळाल्याबद्दल अधिकाधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे भोईर त्यांनी सांगून आयोजकांचे आभार व्यक्त केले.
प्रसाद भोईर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याने यांच्या शिरपेचात मानाचा तुरा निश्चितच रोवला गेला असून यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading