युनियन बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल २,६९१ पदांसाठी भरती; असा करा अर्ज

Union Bank Of India
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यात जवळपास २,६९१ अप्रेंटिसशिप पद भरली जाणार आहेत. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि बॅचलर पदवी मिळवलेल्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी निर्माण झाली आहे.
अर्ज करण्यापूर्वी भरतीसंदर्भातील तपशीलवार माहिती जाणून घ्या.
 राज्यातील रिक्त पदं
देशभरात २,६९१ पदांवर भरती केली जाईल, ज्यामध्ये विविध राज्ये आणि प्रदेशांसाठी रिक्त पदे निश्चित करण्यात आली आहेत.
आंध्र प्रदेशात ५४९, अरुणाचल प्रदेशात १, आसाममध्ये १२, बिहारमध्ये २०, चंदीगडमध्ये १३, छत्तीसगडमध्ये १३, गोव्यात १९, गुजरातमध्ये १२५, हरियाणामध्ये ३३, हिमाचल प्रदेशात २, जम्मू-काश्मीरमध्ये ४, झारखंडमध्ये १७, कर्नाटकमध्ये २८,  महाराष्ट्रात २९६, दिल्लीत ६९, ओडिशामध्ये ५३, पंजाबमध्ये ४८, राजस्थानमध्ये ४१, तामिळनाडूमध्ये १२२, तेलंगणामध्ये ३०४, उत्तराखंडमध्ये ९, उत्तर प्रदेशमध्ये ३६१ आणि पश्चिम बंगालमध्ये ७८ पदांवर भरती करण्यात येणार आहे.
 शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराने १ एप्रिल २०२१ रोजी किंवा नंतर पदवी प्राप्त केलेली असावी.
वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवाराचे वय १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत किमान २० ते कमाल २८ असणे आवश्यक आहे. यात विविध श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली आहे. ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची, एससी, एसटी उमेदवारांना पाच वर्षांची आणि पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना १० वर्षांची सूट मिळेल.
 पगार व निवड प्रक्रिया
स्टायपेंड : १५,००० रुपये
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्थानिक भाषा ज्ञान चाचणी, वेट लिस्ट, वैद्यकीय तपासणी इत्यादी टप्प्यांमधून केली जाईल.
प्रशिक्षण कालावधी : १ वर्ष
अर्ज शुल्क :
सामान्य/ओबीसी उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ८०० रुपये भरावे लागतील, तर एससी/एसटी आणि सर्व महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ६०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. अपंग उमेदवारांना ४०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
अर्ज भरण्याची शेवटी तारीख५ मार्च २०२५
अधिकृत वेबसाइट
 http://www.unionbankofindia.co किंवा bfsissc.com 

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading