‘या’ दोन नेत्यांच्या चौकशीमुळे शिवसेना येणार अडचणीत ?

FOD
महाड ( मिलिंद माने ) : मुंबईच्या कोविड घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आगरी पाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हा विभागाकडून चौकशी करण्यात. येत असल्याने ठाकरे गड अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महापालिकेने कोरोना काळात कोट्यावधीचा घोटाळा केला असा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे त्यांनी ईडीकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते यामध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा सहभाग असल्याचे ईडीने म्हटले होते.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेने कलम 420 आणि कलम 120 ब या दोन कलमाच्या अंतर्गत किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कोविड घोटाळा उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी व मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी covid कफन मध्ये ही कमाई केली 1500 रुपयांची बॉडीबॅग (मृतदेह बॅग)6700. रुपयांना विकत घेतली यामध्ये वेदांत इनो टेक प्रोडोक्ट लिमिटेड कंपनी, महापालिकेचे अधिकारी आणि किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
मुंबईत मृतक कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग 2,000 ऐवजी 6800 रुपयांना खरेदी केल्याचे ईडीने म्हटलं आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने म्हटले माजी महापौर किशोरी पेडणेकर या कोविडच्या काळात मुंबईच्या महापौर होत्या तर दुसरीकडे ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते व माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे सध्या रवींद्र वायकर हे आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या कार्यालयात असून त्यांची कसून चौकशीचा सुरू आहे त्यामुळे ठाकरे गटातील नेत्यांची चांगलीच कोंडी झाली आहे अशी चर्चा राजकीय कोर्टात ऐकण्यास मिळत आहे.
शिवसेनेचे माजी मंत्री व विद्यमान आमदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात आरोप केला होता रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात सोमय्या यांनी तक्रार दिली होती मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधले आहे. त्याची परवानगी वायकर यांनी महापालिकेकडून घेतली नव्हती सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीत होता.
किरीट सोमय्या यांनी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती त्याची आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने गंभीर दखल घेऊन माजी मंत्री व शिवसेनेचे विद्यमान आमदार रवींद्र वायकर यांना आज आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेत चौकशीसाठी बोलावले होते सध्या रवींद्र वायकर हे आर्थिक गुणा शाखेच्या कार्यालयात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात वायकर यांची प्रतिक्रिया मात्र अद्याप समजू शकली नाही, मात्र या चौकशीमुळे ठाकरे गटातील नेते अडचणीत आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading