यंदाही कोकणवासीयांचा प्रवास खड्ड्यातुनच

goa-road
सुकेळी ( दिनेश ठमके ) : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तसेच कोकणवासीयांचा अतिशय महत्त्वाचा सण मानला जाणा-या आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमण काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. तरी काही केल्या मुंबई -गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे विघ्न काही केल्या दुर झालेले नाही. कारण मुंबई -गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण झालेली आहे. अनेक राजकीय नेते गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे भरण्याचा गाजावाजा करत आहेत.
road-goa-5
नुकतेच सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण यांनी देखिल महामार्गाची पाहणी करुन गणेशोत्सवापूर्वी जेवढे शक्य होईल तेवढे काम पुर्ण करण्याचे आश्वासन दिले. पंरतु सध्याची महामार्गावरील रस्त्याची परिस्थिती पाहता यावर्षीदेखिल गणपतीसाठी गावाला जाणा-या कोकणवासीयांना खड्ड्यांमधुनच प्रवास करावा लागणार आहे. त्यातच वाहतुक कोंडीसुद्धा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे भयानक खड्डे मृत्युचे सापळे ठरत आहेत.
goa-road
गणेशोत्सवासाठी गावाला जाणा-या चाकरमान्यांना वडखळ ते इंदापूर या दरम्यानच्या खड्ड्यांमधुन प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वडखळ, नागोठणे, वाकण, सुकेळी, कोलाड ते अगदी इंदापूर पर्यंत खड्ड्यांमधुन कसरतीचा प्रवास दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये कोकणवासियांचा चुकलेला नाही. महामार्ग फक्त म्हणण्यापुरताच! येथील खड्ड्यांचा प्रवास काही संपता संपत नाही. ३ ते ४ फुटांचे खड्डे सध्या महामार्गावर पडलेले आहेत. येणारा पुढचा खड्डा किती मोठा असेल याची धास्ती वाहनचालकांना वाटते.
goa-highway2
तसेच या खड्ड्यांमुळे इंदापुर ते मुंबई या ३ तासांच्या प्रवासाला ६ ते ७ तास लागत आहेत. तर दुसरीकडे बाईकवरुन मुंबई -गोवा महामार्गावरुन गाडी चालवणे म्हणजे दिव्यच. कारण पुढे येणारा खड्डा कधी घात करेल याचा नेम नाही. त्यामुळे महामार्गावरील खड्डे दुचाकी चालकांसाठी देखिल मृत्युचे सापळे ठरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading