स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने द.ग. तटकरे प्रतिष्ठानतर्फे आयोजित तालुकास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज (१ मार्च २०२५) म्हसळ्यात संपन्न झाला. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
ही स्पर्धा १९ ते २७ फेब्रुवारीदरम्यान विविध महत्त्वाच्या तिथींना समर्पित करून राबवण्यात आली. ११ केंद्रांतील २२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. श्रीवर्धन तालुक्यांमध्ये स्वराज्य सप्ताह च्या औचित्य साधत द.ग. तटकरे प्रतिष्ठान यांच्या वतीने तालुकास्तरीय निबंध व वकृत्व स्पर्धेचे आयोजन दिनांक.१९ फेब्रुवारी २०२५ ते दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत शिवजयंती, संत गाडगेबाबा जयंती, मराठी भाषा दिन, या महत्त्वाच्या तिथींचा योग्य संगम साधून करण्यात आले होते.
आत्ताच्या नवीन पिढीला छत्रपती शिवराय, या आपल्या जाणत्या राजा विषयी वैचारिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत सतत प्रवाहित राहण्यासंदर्भात विचारधारांना उजाळा देण्यासंदर्भात आपल्या लाडक्या राजाच्या जीवनपटावरील विविध गोष्टींच्या आठवणींना उजाळा व त्याने केलेल्या थोर कार्याची महती वकृत्व व निबंध लेखनाच्या माध्यमातून हे विचारधारा सतत जिवंत ठेवण्याकरिता छोटासा प्रयत्न.
तालुका स्तरावरती निबंध स्पर्धा,व वक्तृत्व स्पर्धा दिनांक.२७/०२/२०२५ रोजी सकाळी.१०: ०० या वेळेत रा. जि. प. शाळा बोर्ली मधील सरस्वती हॉल येथे संपन्न झाली. तालुक्यात एकूण ११ केंद्र तयार करण्यात आली होती. .यामध्ये समाविष्ट असलेल्या शाळा मधील २२ स्पर्धकाने सहभाग नोंदविला होता. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा लहान गट ई.५ ते ८ वी. विषय- छत्रपती शिवाजी महाराज.
प्रथम क्रमांक:- विश्वनाथ विश्वनाथ जावळेकर. मुराद हमीद टोळ विद्यालय जसवली.द्वितीय क्रमांक:-तनुश्री बाबुराव जनगर. दांडगुरी हायस्कूल. तृतीय क्रमांक अनुश्री अतिश भाटकर.हरिहरेश्वर. चतुर्थ क्रमांक काव्या मिलिंद काप. मराठी शाळा रानवली.
वक्तृत्व स्पर्धा मोठा गट ई.९ वी ते १५ वी.. विषय:- जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. प्रथम क्रमांक:- हर्षाली विश्वनाथ जावळेकर जसवली हायस्कूल. द्वितीय क्रमांक संस्कृती राजकुमार कोलथरकर हरिहरेश्वर. विद्यालय. तृतीय क्रमांक वेदश्री गणेश चोगले विद्यामंदीर दिवेअगार.
निबंध स्पर्धेमध्ये गट ५ वी ते८ वी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज प्रथम क्रमांक सुहास पाडलेकर मो. सो. विद्यालय बोर्ली पंचतन. तृतीय क्रमांक अनुश्री अतिश भाटकर हरिहरेश्वर महाविद्यालय. तृतीय क्रमांक श्रेया मंगेश खापरे राजीप शाळा शेखाडी.
मोठा गट ९ वी ते १५वी विषय राज्य रयतेचे जिजाऊंच्या शिवबाचे प्रथम क्रमांक सलोनी संजय अवेरे दांडगुरी हायस्कूल. द्वितीय क्रमांक मानवी महेंद्र तुरे मो सो विद्यालय बोर्ली पंचतन. तृतीय क्रमांक संस्कृती राजकुमार कोलथरकर हरिहरेश्वर महाविद्यालय या विद्यार्थ्यांनी फटकाविला.
या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून स्वाती ठाकरे, सीमा चव्हाण, संजय बिरादार आदींनी भूमिका बजावली. विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.