श्रीवर्धन तालुक्यातील रा.जि.प.मराठी शाळा भरडखोल या शाळेच्या नूतनीकरण इमारतीचे उद्घाटन सुनिता गुरव शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे हस्ते रविवार दि.१६/३/२०२५ रोजी झाले.रायगड भूषण पुरस्कार प्राप्त समाज सेवक कृष्णा महाडिक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.
पी.एम.श्री.रा.जि.प.मराठी शाळेच्या नादुरुस्त इमारतीच्या दुरुस्ती साठी नाना पालकर स्मृती संस्था मुंबईच्या वतीने श्री कृष्णाजी महाडिक यांच्या प्रयत्नातून अंदाजे ३२ लाख रुपये खर्च करून वर्ग खोल्यांचे पत्रे बसवणे,उंची वाढविणे,रंगकाम,स्वयंपाक गृह दुरुस्ती इत्यादी कामांसह शाळेला टेबल,कपाट,इत्यादी वस्तूही देण्यात आल्या.या दुरुस्ती खर्चासाठी विजय नागरत पंजाब, धनजीभाई गाला, जयंतीभाई छेडा, सुरेंद्रभाई मॅगी, रुपेशभाई इत्यादी दानशूर व्यक्तीनी निधी पुरवला.
दुरुस्तीच्या या कामांमध्ये भरडखोल ग्रामस्थांनी मोठा हातभार लावला. तीन ते चार महिने चाललेल्या कामामुळे शाळेची इमारत आता मजबूत व सुंदर दिसू लागली आहे. या नूतनीकरण उद्घाटन सोहळ्यासाठी माननीय शिक्षणाधिकारी श्रीमती गुरव, पी.एस.आय. हनुमंत शिंदे ,सरपंच ज्योतीताई कालपाटील, कोळी समाज अध्यक्ष विठ्ठल भोईंकर, कुणबी समाज अध्यक्ष नागले, मुस्लिम समाज अध्यक्ष नियाजभाई सोलकर, विस्तार अधिकारी धामणकर , विविध मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ,पालक वर्ग इत्यादी उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष वाघे, उपाध्यक्ष यशवंत पावशे,व सदस्य,मुख्याध्यापक हेमंत पाटील आणि शिक्षक वर्ग यांनी या कामी खूप मोठे योगदान लाभले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.