महाड तालुक्यातील अद्योगिक क्षेत्रातील बिरवाडी हद्दीत असलेल्या स्वामी मोबाईल शॉपीमध्ये दारूच्या नशेत दोघांनी मोबाईल रिचार्ज करण्यावरून वादविवाद व राडा करून मोबाईल शॉपी मालक व कामगाराला बेदम मारहाण केली. या मध्ये मालक आणि कामगार जखमी झाले असून मारहाण करणाऱ्या दोन हल्लेखोरांवर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड जवळील बिरवाडी गावातील ऋतिक संजय पवार रा.ढालकाठी महाड यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार गुरुवारी संध्याकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील अद्योगिक क्षेत्रात असलेल्या बिरवाडी गावहद्दीतील स्वामी मोबाईल शॉपी मध्ये हल्लेखोर कैलास भागोजी जगताप-२७ रा.साकडी महाड आणि विनेश विनोद सकपाळ-२० रा.भिवघर महाड हे दारूच्या नशेत दुकानात आले.आणि त्यांनी मोबाईल रिचार्ज करण्यास सांगितले. मोबाईल रिचार्ज होत नाही दुरुस्त होतो असे मोबाईल शॉपी मालकाने व कामगाराने सांगितले असता या दोघांनी दारूच्या नशेतमोबाईल शॉपी मालक सागर संजय यांना बेदम मारहाण केली.
या मध्ये फिर्यादी आणि मालक दोघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादवी कलम ४५२/३२४/५०४/५०६/३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.