मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीला पोलीस निरिक्षक नितीन मोहिते यांचा सकारात्मक प्रतिसाद  

Kolad Police Baithak

कोलाड ( श्याम लोखंडे ) :

मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावर गेली अनेक वर्ष मोकाट जनावरांचे कळप च्या कळप मध्यभागतील रस्त्यांवर तसेच मार्गाच्या कडेला थांड मांडून बसलेले असतात त्यामुळे काही जनावरे आपघाताला सामोरे जातात तर काही जनवरांच्यामुळे आपघात घडून वाहन चालक व प्रवासी जखमी होतात त्यामुळे गेली अनेक दिवस येथील ग्रामस्थ नागरीक सदरच्या समस्येबाबत आक्रमक झाले असून या गोष्टीचा पाठपुरावा म्हणून कोलाड आंबेवाडी नाक्यावरील ग्रामस्थ तसेच विविध सामजिक संघटना पत्रकार यांनी शनिवारी विभागीय पोलीस निरिक्षक नितिन मोहिते यांची भेट घेऊन साऱ्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडत यावर उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना उबाठा गटाचे रोहा तालुका उपप्रमुख चंद्रकांत लोखंडे, प्रफुल बेटकर, विष्णू महाबले, विजय शिंदे, महेश स्वामी जंगम, पत्रकार श्याम लोखंडे, विश्र्वास निकम, तेजपाल जैन,परदेशी ,सह कोलाड आंबेवाडी ग्रामस्थ,विविध संघटनांचे पदाधिकारी, वृत्तपत्रांचे प्रतिनिधी तसेच डिजिटल मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रसंगी यावेळी उपस्थित नागरिकांनी मोकाट जनावरांची व्यथा पोलिस निरिक्षक यांच्या समोर मांडली दिवसेंदिवस मोकाट गुरांच्यात होत असलेली वाढ त्याच बरोबर वाढते आपघात तसेच ही गुरे ढोरे रात्री अपरात्री कुठेही उभी तसेच बसून रवंथ करीत असतात त्यामुळे काही गुरांना आपघातात होत असलेली दुखापत तर जड अवजड वाहनांच्या धडकेने जागीच मृत्यू पावत असल्याच्या घटना घडत आहेत तर काही दुचाकीस्वार यांना धडक बसल्याने ते देखिल जखमी होतात. यांचे मालक कोण ती कोणत्या गावातील आहेत यांचा थानपत्ता नाही परंतू मार्गाचे रुंदीकणाचे काम सुरू आहे त्यात राष्ट्रिय महामार्ग म्हणून वाहतुकीचे प्रमाण देखिल अधिक असल्याने यावर उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी यावेळी कोलाड पोलिस प्रशासनाकडे केली.
————————————-
कोलाड आंबेवाडी नाका तसेच परीसरात मोकाट गुरांच्या संख्येत भयानक वाढ झाली आहे त्यामुळे ही गुरे ढोरे रस्त्यावर येऊन आपघाताला कारणीभूत ठरत आहेत तर दुसरीकडे आपघात देखील घडत आहेत तसेच त्यांचे मालक कोण आहेत तसेच ती कोणत्या गावातील आहेत याचा पत्ता नाही मात्र दुर्दैवाने त्यांचा अंत झाला तर मनाला खूप वेदना होत असल्याने यांना नजीकच्या गो शाळेत अथवा त्यांचे मालक शोधून त्यांना त्यांच्या ताब्यात देणे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोखंडे यांनी कोलाड पोलिस निरिक्षक यांचे कडे केली असल्याचे सांगितले.
————————————-
कोलाड आंबेवाडी ग्रामस्थ तसेच या परिसरातील विविध संघटना, वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी यांनी मुंबई गोवा महामार्गावर विशेषतः कोलाड आंबेवाडी नाक्यावर मुख्य चौक व परिसरातील वरसगाव, कोलाड भीरा मार्ग,कोलाड रोहा मार्ग आणि ठिक ठिकाणी मोकाट गुरांचा कळप थांड मांडून बसलेले असतात तसेच मेन मार्गावर आल्याने आपघास कारणीभूत ठरत आहेत तसेच अधिक आपघात समस्येत वाढ होऊ नये यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून यावर उपाय योजना करण्याची मागणी केली आहे तसेच या परिसरातील संबधीत पोलिस पाटील,सरपंच,यांच्या समवेत तसेच गाव स्तरांवर बैठका घेऊन मालकांचा शोध घेऊन काही दिवसांत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन पोलिस निरिक्षक नितिन मोहिते यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading