काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अलिबाग समोर एस टी बस आणि दुचाकी अपघातात वरसोली येथील तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना महाड तालुक्यातील बिरवाडी काळीज येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस आणि मोटर सायकल यांच्यात समोरासमोर धडक लागल्याने ५७ वर्षीय इसमचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, मयत राजेंद्र लक्ष्मण जाधव (वय-५७ वर्षे रा.खैरे, ता.महाड, जि. रायगड) हे ८मार्च २०२५ रोजी त्याची हिरो फॅशन मोटरसायकल क्र. एम एच ०६ बी वाय ९९७० ही घेऊन वाळण बाजूकडून काळीज बाजूकडे जात असताना सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास काळीज गावचे हददीत एमएमए मैदानाचे समोर काळीज वाळण रोडवर आल्यावेळी समोरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या महाड आगारात कार्यरत असणार बस चालक किरण श्रीमंत गायकवाड याने त्याचे ताब्यातील एसटी बस नं.एम.एच २० बीएल ३७९९ ही काळीज बाजूकडून वारंगी बाजूकडे घेवून जात असताना सदरची बस ही अतिवेगाने हयगयीने बेदरकारपणे चालवून रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून राजेंद्र जाधव यांच्या मोटर सायकलीस धडक दिली. या अपघातात राजेंद्र जाधव हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना महाशक्ती रुग्णवाहिकेने तातडीने उपचारासाठी महाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मयत राजेंद्र लक्ष्मण जाधव हे खैरे गावचे पोलीस पाटील असून त्यांची कन्या हिचा विवाह हा मे 2025 मध्ये ठरलं आहे. मात्र मुलीचा विवाह लावून तिला सासरी पाठविण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला असल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळले आहे.
याबाबत महाड एम आय डी सी पोलिस ठाण्यात गु रजि नं-२४/२०२५ भा.न्या.सं. कलम -१०६ (१),२८१,१२५(ए), १२५ (बी) सह मोवाका कलम १८४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शाखाली पोलिस हवालदार व्हि.व्हि.पवार करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.