
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) :
मुरूड शहरात अलकापुरी परिसरात पाठपुरावा केल्याने शासकीय विकास निधीतुन 11 कोटी 50 लाख खर्चून अद्ययावत डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची भव्य दिव्य इमारत उभी राहत असून याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. विकास निधी बाबत आम्ही बौद्ध समाज बांधवांना दिलेला शब्द पूर्णत्वास नेला. बौद्धजन बांधवांसाठी आणि पर्यटन विकासात डॉ आंबेडकर स्मारक शांतीचे प्रतीक आणि स्फुर्तीदायी प्रेरणास्थान राहील असे प्रतिपादन अलिबाग- मुरूड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी मंगळवारी सकाळी मुरूड मध्ये आयोजित बौद्ध धम्म जाहीर मेळाव्यात बोलताना केले.मुरूड तालुका बौद्धजन सेवा संघाचे वतीने गावदेवी मैदान अलकापुरी येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 800 बौद्ध बांधव- भगिनी या प्रसंगी उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिका माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, बौद्धजन केंद्रीय समितीचे अध्यक्ष किशोर शिंदे, दीपक कांबळे, बौद्धजन केंद्रिय समितीचे अध्यक्ष किशोर शिंदे, पनवेल महानगर पालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, मुरूड तालुका प्रमुख बबन शिंदे, आरपीआय कोकण प्रदेश सह सचिव जयप्रकाश पवार, सुरेश मोरे, नामदेव गायकवाड, वसंत मोरे, नरेंद्र जाधव,मंगेश येलवे, हरिचन्द्र कासारे, धर्मेश मोरे, शिवसेना उप जिल्हा प्रमुख भरत शेठ बेलोसे,तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरिकर,मुअज्जम हसवारे, माजी नगराध्यक्ष अशोक धुमाळ,मनोहर तांबे, जिल्हा शिवसेना संघटिका तृप्ती पाटील, माजी नगराध्यक्ष स्नेहा ताई पाटील, विजय मोरे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
आमदार दळवी पुढे म्हणाले की, अतिशय देखण्या प्रशस्त इमारतीत स्मारकाचा भव्य दिव्य लोकार्पण सोहोळा निवडणूक झाल्या नंतर कोणतीही त्रुटी न ठेवता करण्यात येईल. 40 वर्षांपासून स्मारकाचा प्रश्न रेंगाळला होता. महायुतीच्या अडीच वर्षां च्या काळात मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे सरकारने विकास कामे तळागाळापर्यंत पोहचवुन विकास साधला आहे. माजी उपमहापौर जगदीश गायकवाड म्हणाले की मुरूड मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे देखणे स्मारक उभारू असे आश्वासन आ.दळवी यांनी दिले होते. तो शब्द त्यांनी पाळला आहे.असे आमदार कधीतरीच लाभतात. यापुढे देखील महेंद्र दळवी यांना पुन्हा निवडून द्यायचे आहे हा निर्णय समाज बांधवांनी मनामध्ये पक्का ठेवावा असे आवाहन जगदीश गायकवाड यांनी केले.
पुढील मंत्रिमंडळात शब्द पाळणारा आपला आमदार महेंद्र दळवी मंत्री म्हणून दिसतील असा आत्मविश्वास जगदीश गायकवाड यांनी व्यक्त केला. बौद्धजन केंद्रीय समितीचे अध्यक्ष किशोर शिंदे म्हणाले की विश्वाला शांतीचा संदेश देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मुरूड मध्ये उभारून आमदार दळवी यांनी बौद्धबांधवांचे कैवारी म्हणून मोठे सामाजिक कार्य केले आहे.त्यामुळे बौद्धसमाज बांधवांचा आ.महेंद्र दळवी यांना मोठा पाठिंबा मिळणारच असा विश्वास व्यक्त केला.