अलिबाग ( अमुलकुमार जैन ) :
रायगड जिल्ह्यातील मुरुड शहरातील भोगेश्वर पाखाडी येथे 12 सप्टेंबर 2024 रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीवर दोन अल्पवयीन मुस्लिम मुलांनी दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम मुलांना धार्मिक शिक्षण देणाऱ्या मौलवीला अटक करण्याची मागणी केली. त्यांनी मुरुड पोलिस ठाण्याला भेट देऊन कठोर कारवाईची मागणी केली.
राणेंनी हिंदूंना न्याय मिळत नसल्याचे सांगत, या घटनेवर पोलिसांची कार्यवाही अपुरी असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी मौलवीला अटक न केल्यास स्वतः यंत्रणा राबवून त्याला अटक करण्याची धमकी दिली. मुरुड शहरात तणावाचे वातावरण असून हिंदू समाजाने घटनेचा निषेध केला आहे.
.