मुरुड येथे जंजिरा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

Janjira Mukti Din
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
मुरुडमध्ये आज जंजिरा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, हा जंजिरा मुक्ती संग्राम दिन शासकीय स्तरावर व्हावा यासाठी रायगड प्रेस क्लब आणि मुरुड तालुका पत्रकार संघ यांच्या माध्यमातून गेले दोन वर्ष सातत्याने मुख्यमंत्री यांच्यासह इतर मंत्र्यांना केलेल्या पत्रव्यवहारामुळे शासनाने आता याबाबतचा अहवाल मुरुड तहसीलदार यांच्याकडून मागवला असल्यामुळे पुढील वर्षीचा जंजिरा मुक्ती संग्राम दिन हा शासकीय स्तरावरील होईल अशी ग्वाही रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष तथा मराठी पत्रकार परिषदेचे सचिव मनोज खांबे यांनी यावेळी बोलताना दिली.
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले होते.परंतु जंजिरा संस्थान हे ३१ जानेवारी १९४८ रोजी जंजिरा नवाबाने शामिल नाम्यावर सही केल्याने ते भारतात विलीन झाले होते. म्हणून ३१ जानेवारी हा दिवस जंजिरा मुक्ती संग्राम दिन म्हणून रायगड प्रेस क्लब व मुरुड तालुका पत्रकार संघाच्या वतीने साजरा करण्यात येतो. यंदाही मोठ्या उत्साहात हा जंजिरा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्या शुभ हस्ते आज सकाळी आझाद चौकात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी रायगड प्रेस क्लब चे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी जंजिरा मुक्ती संग्राम दिन पुढील वर्षी शासकीय स्थरावर साजरा हवा यासाठी रायगड प्रेस क्लब यासाठी गेली 14 वर्ष पाठ पुरावा करत असून गेली दोन वर्ष तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने याबाबतचा पत्रव्यवहार आपण केला असून त्या पत्र व्यवहाराला उत्तर म्हणून सामान्य प्रशासनाने मुरुडचे तहसीलदार यांना पत्र पाठवून याबाबतचा अहवाल लवकरात लवकर पाठवावा असेच सांगितल्याचे पत्र पाठवले आहे. त्यामुळे या आपल्या मागणीला आता चालना मिळाली असून पुढल्या वर्षी जंजिरा मुक्ती संग्राम दिन हा शासकीय स्तरावर होईल अशी ग्वाही मनोज खांबे यांनी यावेळी दिली.
यावेळी मुरुड तालुका पत्रकार संघाचे खजिनदार उदय खोत यांनी जंजिरा संस्थानचा संपूर्ण इतिहास सांगताना सांगितले कि,कोणतीही रक्तरंजित क्रांती न घडता जंजिरा संस्थान हे भारतात विलीन करण्यात आले आहे.जंजिरा नवाब हे लोकहितवादी राजा होते.खुपश्या सुविधा त्यांनी जनतेला प्राप्त करून दिल्या होत्या.परंतु प्रजा परिषद नावाची संस्था स्थापन होऊन त्यांनी जंजिरा संस्थान भारतात विलीन करावे अशी आग्रही मागणी धरून धरली.म्हसळा व श्रीवर्धन तालुके जनतेने ताब्यात घेतले.
आता मोर्चा मुरुड कडे वळणार त्यापूर्वीच म्हणजेच जंजिरा नवाब यांनी त्यावेळचे तत्त्काली मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या समोर जंजिरा शामिल नाम्यावर सही ३१ जानेवारी १९४८ ला केली व जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले.रायगड प्रेस क्लब व मुरुड तालुका पत्रकार संघाचा हा प्रयत्न आहे कि, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जसा साजरा होतो तसाच जंजिरा मुक्ती संग्राम दिन शासन स्थरावर साजरा व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.अशी माहिती यावेळी खोत यांनी दिली.
यावेळी मुरुड शहरातील माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर,माजी नगरसेवक प्रमोद भायदे,पोलीस निरीक्षक नामदेव बडगर,नायब तहसीलदार संजय तवर,रायगड प्रेस क्लब चे जिल्हा अध्यक्ष मनोज खांबे, मुरुड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिराज शेख,आदेश दांडेकर,मुख्याध्यापक सरोज राणे,माजी नगरसेवक पांडुरंग आरेकर,माजी तहसीलदार नयन कर्णिक आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading