अलिबाग तालुक्यातील मुनवली येथे होळी व धुलिवंदन मोठ्या साजरी करण्यात आली. मागील नऊ दिवसांपासून होळी उत्सवाची गुरुवारी रात्री होलिका दहनांनंतर सांगता झाली, आदल्या दिवशीच भाविकांनी होळीची तय्यारी पूर्ण केली होती, गुरुवारी सकाळपासूनच माताभगिनींनी होळीची पूजाअर्चा करण्यासाठी गर्दी केली होती.
यादरम्यान गावातीलच लहान मुलांचे विविध मनोरंजनाची व खेळांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रात्री उशिरा आरती झाल्यानंतर होळी भोवती गोलाकार प्रदक्षिणा घालत पारंपरिक पद्धतीने गीत गात होलिकाला अग्नीच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी भाविकांनी विशिष्ट प्रकारची बोंब ठोकली होती. यानंतर उपस्थित सर्वस्तरातील लहानांसह महिला व पुरुष भाविक व ग्रामस्थांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी आपल्या स्वखर्चाने पडद्यावरील ‘छावा’ चित्रपटाचे नियोजन व आयोजन केले होते, हा चित्रपट सर्व सामान्य लोकांना पाहता यावा यासाठी घाडी यांनी प्रयत्न केला. मागील काही वर्षांपासून बंद असलेला पडद्यावरील चित्रपट पुन्हा एकदा पाहण्याचा योग सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी जुळवून आणल्याबद्दल त्यांचे उपस्थित जुन्या काळातील भाविक व ग्रामस्थांनी कौतुक व आभार व्यक्त केले, चित्रपट पाहण्यासाठी सर्वांनीच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
धुलीवंदनाच्या दिवशी सकाळपासूनच सर्व लहानांपासून ते तरुणांनी मोठ्या जल्लोषात रंग आणि पाण्याची उधळण करत करण्यात आली. मुनवली गावातील गल्लोगल्ली लहान मुले, मुली, तरुण मंडळी धुळवड खेळताना पाहायला मिळाले. यावेळी मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी धुलीवंदनाच्या वेळी लागणारे वेगवेगळे रंग उपलब्ध करुन दिले होते, सचिन घाडी मित्रमंडळाने एकत्र येत रंगांची उधळण करीत धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली.
लहान मुले आणि मुलींनी वेगवेगळ्या प्रकारची पारंपरिक वेशभूषा करत व विविध प्रकारची सोंगे घेत वाजतगाजत शिमग्याची पोस्त मागण्याची परंपरा देखील जपण्यात आली. यावेळीआदिवासी बांधव देखील रंगांची उधळण करत विविध पारंपरिक पद्धतीने नृत्ये सादर करताना व पोस्त घेताना दिसत होते. एकंदरीतच शुक्रवारी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी होळीच्या व धुलीवंदनाच्या इतर समाजबांधवांनी शुभेच्छा दिल्या.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.